ETV Bharat / state

Kolhapur Immersion Issue : प्रशासनाचे निर्बंध झुगारून अखेर पंचगंगा नदीत गणेश मूर्तींचं विसर्जन - immersing Ganesha idol in Panchganga river

Kolhapur Immersion Issue : मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार गेल्या दोन वर्षांपासून पंचगंगेत एकही गणेश मूर्ती (Immersion of Ganesha idol in Panchganga river) विसर्जित झाली नव्हती. (Kolhapur Panchganga river) मात्र यंदा प्रशासनाने घातलेले निर्बंध तोडत कोल्हापूरकरांनी गणेशमूर्ती पंचगंगा नदीत विसर्जन करून (police clash against Hindutva) आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. काही कार्यकर्त्यांनी घेतलेल्या भूमिकेसमोर प्रशासन नमले आणि अखेर नदीघाटावर लावलेले सर्व निर्बंध हटवण्यात आले.

Kolhapur Immersion Issue
हिंदुत्ववाद्यांचा पुढाकार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 23, 2023, 8:24 PM IST

अखेर हिंदुत्ववाद्यांनी प्रशासनाचे निर्बंध झुगारले, गणेश मूर्तीचे पंचगंगेत विसर्जन

कोल्हापूर Kolhapur Immersion Issue : पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर असल्याने नदीमध्ये गणेश मूर्ती विसर्जित न करण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा (Immersion of Ganesha idol in Panchganga river) प्रशासनाने घेतला होता. याला कोल्हापूरकरांनी (Kolhapur Panchganga river) दोन वर्ष चांगला प्रतिसाद दिला. मात्र, यंदा कोल्हापुरातील काही कार्यकर्त्यांनी घेतलेल्या भूमिकेवरून प्रशासन (police clash against Hindutva) आणि कार्यकर्ते आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास गायकवाड वाडा येथे आमने-सामने आले. जिल्हा पोलीस दल आणि महानगरपालिकेकडून पंचगंगा नदी घाट परिसरात बॅरिकेट लावून घाटावर जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. कार्यकर्त्यांनी एकत्र येत चार वाजेपर्यंत बॅरिकेट हटवा, अन्यथा बॅरिकेट तोडून नदीतील वाहत्या पाण्यात गणेशमूर्ती विसर्जित करणार असल्याचा निर्धार केला होता. सायंकाळी चार वाजता शहरातील सर्व संबंधित संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाने लावलेले बॅरिकेट ढकलून लावत नदी घाटावर प्रवेश केला, नागरिकांनाही वाहत्या पाण्यात गणेश मूर्ती विसर्जित करण्याचं आवाहन केलं. मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांपुढे पोलीस प्रशासनही हतबल झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. कार्यकर्त्यांनी बॅरिकेट्स हटवून नदीमध्ये गणेशमूर्ती विसर्जित केल्या.

पर्यावरणपूरक विसर्जनाला छेद : कोल्हापूरची जीवनदायिनी असलेल्या पंचगंगा नदीचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच आहे. याला नदीकाठावरील साखर कारखाने मैलामिश्रित आणि केमिकल युक्त सांडपाणी जबाबदार असल्याचा आरोप होतो. नदीतील जलचर मृत्युमुखी पडले होते. गणेश विसर्जनात गणेश मूर्ती थेट नदीत विसर्जित केल्यामुळेही प्रदूषणाला हातभार लागेल. यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने कोल्हापूर महापालिका आणि प्रशासनाला गणेश मूर्ती विसर्जन नदीत न करण्याचे निर्देश दिले होते. गेली दोन वर्षे कृत्रिम कुंडातच विसर्जन करून कोल्हापूरकरांनी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा केला होता. मात्र यंदा काही कार्यकर्त्यांनी प्रशासनाचे निर्बंध झुकारून लावले.

लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप : सकाळी अकरा वाजल्यापासूनच शहरातील अनेक ठिकाणी महापालिकेने उभारलेल्या कृत्रिम कुंडामध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. मात्र, सायंकाळी चार नंतर कोल्हापूरकरांनी पंचगंगा नदीत गणेश मूर्ती विसर्जन करून लाडक्या बाप्पाला निरोप दिला. घरगुती गणेश मूर्ती पंचगंगा नदीत विसर्जित झाल्यामुळे आता सार्वजनिक तरुण मंडळाच्या गणेश मूर्तींबाबत प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

काय आहे कार्यकर्त्यांचे मत - मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार पंचगंगा नदीचे प्रदूषण थांबवण्यासाठी गणेश मूर्ती नदीत विसर्जन न करण्याचा निर्णय घेण्यात आला. याची अंमलबजावणीही गेल्या वर्षी सह यंदाही प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र गणेश मूर्तीने कोणतेही प्रदूषण होत नाही, नदीत नैवेद्य अर्पण केल्यानंतर नैवेद्यातील असणाऱ्या जीवनसत्त्वावर नदीतील जलचरांना अन्न मिळते. यामुळे कोणतेही प्रदूषण होत नाही अशी भूमिका घेत रितीरिवाजाप्रमाणे वाहत्या पाण्यातच विसर्जन करणार अशी भूमिका कोल्हापुरातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.

हेही वाचा:

  1. Kolhapur Flood Update : कोल्हापूरसाठी पुढील 24 तास महत्त्वाचे; धरण क्षेत्रातील मुसळधार पावसाने पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ
  2. Deepak Kesarkar On Rain : महापूराचे संकट टळले; स्थलांतरित नागरिकांना पुन्हा घरी सोडणार - दीपक केसरकर
  3. Panchganga River Floods : राधानगरी धरणाचे सात दराचे उघडले; पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवर, सतेज पाटलांचे कर्नाटक मुख्यमंत्र्यांना पत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.