कोल्हापूर: मोहन अंबादास शितोळे आणि छाया मोहन शितोळे असे या दाम्पत्याचे नाव असून दोघेही साताऱ्यातील मेढा मधील रहिवासी आहेत. अपहरण केलेल्या मुलाला ताब्यात घेऊन त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात सुखरूप दिले आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील खंडाळा मधील शिवाजीनगर येथे राहणारे सुषमा राहुल नाईक नवरे या आपल्या सहा वर्षाच्या मुलासह दिनांक 3 मार्च रोजी श्री क्षेत्र आदमापूर येथे देवदर्शनासाठी आले होते. त्यादिवशी मुक्काम करून ते दुसऱ्या दिवशी आंघोळीसाठी गेले असता त्यांच्यासोबत असलेल्या सहा वर्षाच्या लहान मुलाचे अपहरण अज्ञातांनी केली. त्याबाबतची फिर्याद त्यांनी भुदरगड पोलीस ठाण्यात दिली. तर कोल्हापूर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत सात तपास पथक तैनात करून तपासासाठी विविध दिशेला पाठवण्यात आली होती. पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी आणि पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. दरम्यान मंदिरातून आणि रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासात संशयित आरोपी हा त्याची दुचाकी एचएफ डीलक्स गाडी क्रमांक MH11 CN 2066 या दोन चाकीवरून एका महिलेसह मुलाला घेऊन मुलाला घेऊन भुदरगड हद्दीतून कर्नाटक हद्दीत निपाणी, चिकोडी,अंकली, चिंचणी, मायाका, मार्गे मिरज कडे गेल्याचे आढळून आले.
गाडीच्या क्रमांकावरून आरोपींचा शोध: गाडीचा नंबर घेत तांत्रिक दृष्ट्या पोलिसांनी तपास करत त्यावरून माहितीच्या आधारे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समोर आले. संशयित आरोपी मोहन अंबादास शितोळे आणि पत्नी छाया शितोळे दोघे मूळ राहणार. मेढा, जावळी,सातारा येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्या आधारे तपास केली असता दोघेही सध्या सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील जवळी येथे राहत असल्याचे समोर आले. सांगोला पोलिसांना याबाबतची माहिती कळवत दोन्ही संशयित आरोपींना ताब्यात घेतले आणि सहा वर्षीय अल्पवयीन मुलाला ही ताब्यात घेऊन त्याच्या आई-वडिलांकडे सुखरूपपणे पोहोचते केले. दरम्यान अवघ्या 48 तासात संशयित आरोपींना ताब्यात घेत मुलाची सुखरूप सुटका केल्याबद्दल पोलीस अधीक्षकांकडून तपास पथकाला बक्षीस म्हणून पंचवीस हजार रुपये देखील जाहीर करण्यात आले आहे.
दोघेही भिक्षु: दोन्ही संशयीत आरोपी हे भिक्षु असून त्यांचा ठावठिकाणा शोधून काढणे व लहान मुलांची सुखरूप सुटका करणे हे पोलीस पथकासमोर आव्हान होते. मात्र तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयतांना ताब्यात घेतले असून ही कारवाई पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे व अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई निकेश खाटमोडे उपविभागीय पोलीस अधिकारी गडहिंग्लज चे राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. यामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, विनायक सपाटे, पोलीस अंमलदार सुरेश पाटील, रणजीत पाटील, रामचंद्र कोळी, विनोद कांबळे, तुकाराम राजीगरे, अजय काळे, संजय पडवळ, अनिल जाधव सारिका मोटे यांनी संयुक्त रीत्या केली.
हेही वाचा: Obscene MMS Threats : अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; महिला व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी