ETV Bharat / state

ईटीव्ही भारत विशेष : पिढ्यांपिढ्या अंबाबाईच्या मौल्यवान दागिन्यांची जबाबदारी कोल्हापुरातल्या 'या' कुटुंबावर - Treasurer of Ambabai's jewelery news

गेल्या 300 वर्षांपासून पिढ्यांपिढ्या खांडेकर कुटुंबावर अंबाबाईच्या दागिन्यांची जबाबदारी आहे. इंद्रोजी खांडेकर यांच्यापासून ही परंपरा सुरू झाली असून त्यांच्या 11 व्या पिढीकडे म्हणजेच महेश खांडेकर यांच्याकडे आजही दागिन्यांची जबाबदारी आहे. त्यांनीही ही परंपरा कायम ठेवली असून आता त्यांना यासाठी मानधनसुद्धा मिळते.

अंबाबाईच्या मौल्यवान दागिन्यांची जबाबदारी कोल्हापुरातल्या 'या' कुटुंबावर

author img

By

Published : Oct 15, 2020, 4:32 PM IST

कोल्हापूर - दरवर्षी कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडत असतो. यावेळी देवीचा साजशृंगार हा अत्यंत देखणा आणि लोभस असतो. तिच्या या शृंगारामध्ये मौल्यवान दागिने अधिक भर घालतात. याच मौल्यवान दागिन्यांची 300 वर्षांपासून देखभाल करण्याची जबाबदारी कोल्हापुरातल्या एका कुटुंबावर आहे. कोण आहेत जे या मौल्यवान खजिन्याची काळजी घेत असतात, कशा प्रकारे त्यांचा एकूणच दिनक्रम असतो आणि या खजिन्यात अंबाबाईचे कोणकोणते मौल्यवान दागिने आहेत, यावरचा हा खास रिपोर्ट.

अंबाबाईच्या मौल्यवान दागिन्यांची जबाबदारी कोल्हापुरातल्या 'या' कुटुंबावर

दरवर्षी नवरात्रोत्सव जवळ आल्यानंतर आंबाबईच्या सर्वच सोन्या-चांदीच्या दागिन्यांची स्वच्छता केली जाते आणि याचवेळी देवीचे सर्व दागिने पाहायला मिळतात. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून देवीचे हे मौल्यवान दागिने सांभाळण्याची जबाबदारी कोल्हापुरातल्या खांडेकर कुटुंबावर आहे. 2013 पासून या दागिन्यांचे खजिनदार (हवालदार) म्हणून काळजी घेण्याची जबाबदारी महेश खांडेकर यांच्याकडे आहे. महेश खांडेकर यांच्याकडे त्यांचे वडील महादेव खांडेकर यांच्याकडून ही जबाबदारी आली. गेल्या 300 वर्षांपासून पिढ्यानपिढ्या या कुटुंबावर खजिनदार म्हणून जबाबदारी आहे. इंद्रोजी खांडेकर यांच्यापासून ही परंपरा सुरू झाली असून त्यांच्या 11 व्या पिढीकडे म्हणजेच महेश खांडेकर यांच्याकडे आजही दागिन्यांची जबाबदारी आहे. त्यांनीही ही परंपरा कायम ठेवली असून आता त्यांना यासाठी मानधनसुद्धा मिळते.

दरवर्षी नवरात्रोत्सवानिमित्त देवीचे सर्वच दागिने स्वच्छ केले जातात. आजही ही परंपरा कायम आहे. या दागिन्यांमध्ये प्रामुख्याने जडावाचे मयूर कुंडले, किरीट आणि किरीटवर घातले जाणारे सोन्याचे पान, ठुशी, कोल्हापुरी साज, 16 पदरी चंद्रहार, चिंचपेटी, मोहराची माळ, म्हाळुंग, 84 मण्यांचा लफ्फा, मोरपक्षी, सातपदरी आणि चारपदरी कंठी, तोडे, श्रीयंत्र, शिवकालीन कवड्याची माळ, नथ, बाजूबंद, बोरमाळ, गदा, पुतळ्याची माळ, पादुका आदी मौल्यवान दागिन्यांचा समावेश असून दरवर्षी याची स्वच्छता केली जाते.

अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्यात हा संपूर्ण खजिना ठेवला जातो. त्यावर 24 तास सीसीटीव्हीची नजर असते. दररोज दुपारी देवीचे नित्यलंकार बाहेर काढून ते देवीला घातले जातात आणि रात्री पुन्हा सुखरूप ठेवले जातात. नवरात्रोत्सव आणि सणासुदीला मात्र देवीला जडावाचे दागिने घातले केले जातात. नवरात्रोत्सवात रात्री उशिरा दागिने पुन्हा काढून ठेवले जातात. गेल्या 300 वर्षांपासून खांडेकर कुटुंबाकडे अंबाबाईच्या दागिन्यांच्या देखभालीची जबाबदारी असून त्यांनी आजही ही परंपरा कायम ठेवली आहे.

हेही वाचा - अंबाबाईच्या चांदीच्या दागिन्यांना झळाळी; उद्या सोन्याच्या दागिन्यांची होणार स्वच्छता

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.