कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठात माजी विद्यार्थी संघटनेकडून शिव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात होणाऱ्या इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाला अंधश्रद्धा निर्मूलन समिती तसेच विविध संघटनाकडून विरोध दर्शवण्यात येत आहे.
याबाबत अंनिसच्या सीमा पाटील यांच्यासोबत 'ईटीव्ही भारत'ने बातचित केली. अवैज्ञानिक वक्तव्य आणि दावे करणाऱ्या व्यक्तीला विद्यापीठात बोलवणे खटकतेय, अशी प्रतिक्रिया यावेळी पाटील यांनी दिली. आम्ही कार्यक्रम बंद पाडायला नाही, तर कुलगुरुंना याबाबत विनंती करायला आलेलो आहोत, असेही त्या म्हणाल्या.
हेही वाचा - हसन मुश्रीफ म्हणतात... 'इंदोरीकर महाराज चांगले कीर्तनकार'
सम-विषम दिवसांचा फॉर्म्युला वापरून मुलगा होईल की मुलगी हे ठरवता येते, असे वक्तव्य कीर्तनात केल्याने इंदोरीकर महाराज वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्यावर पीसीपीएनडीटी कायद्याचा भंग केल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे.