कोल्हापूर : मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजप व शिंदे गटात सोबत गेल्याने जिल्ह्याच्या राजकारणात देखील मोठे बदल झाले आहेत. राज्यात सध्या भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशी सत्ता स्थापन झाली (Hasan Mushrif Welcome In Kolhapur) असून आमदार हसन मुश्रीफ यांनी रविवारी मंत्री पदाची शपथ घेत सर्वांनाच धक्का दिला. यानंतर ते आज (Cabinet Minister Hasan Mushrif) दुपारी बाराच्या सुमारास कोल्हापुरात दाखल झाले. यावेळी हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. (Hasan Mushrif Kagal Gathering) ठिकठिकाणी त्यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले होते. तर छत्रपती ताराराणी चौकात हजारो कार्यकर्ते एकत्र आले होते.
गेलेले कार्यकर्ते परत येतील : यावेळी मुश्रीफ यांनी छत्रपती ताराराणी यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यानंतर त्यांच्या रॅलीला सुरुवात झाली. ताराराणी चौक, दाभोळकर कॉर्नर, व्हीनस कॉर्नर मार्गे रॅली दसरा चौकात आली. येथे मुश्रीफ यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन केले. यानंतर नर्सरी बागेतील शाहू समाधी स्थळाला देखील त्यांनी अभिवादन केले. ते करवीर निवासिनी अंबाबाईच्या चरणी नतमस्तक झाले. दरम्यान आज संध्याकाळी कागल येथे त्यांची जाहीर सभा होणार असून या सभेत पुढील राजकीय वाटचालीची ते माहिती देणार आहेत. तर आज माझे जंगी स्वागत केले हे पाहून मी भारावून गेलो आहे, असे ते यावेळी म्हणाले. तर त्यांना सोडून गेलेले कार्यकर्ते देखील लवकरच आपल्या सोबत पुन्हा येतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
रॅलीपेक्षा चौकात लावलेल्या पोस्टरची चर्चा जास्त : आमदार हसन मुश्रीफ मंत्री झाल्याने संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचे बॅनर लावण्यात आले आहेत. तर ते आज कोल्हापुरात येणार असल्याने ताराराणी चौकात देखील त्यांचे मोठे पोस्टर लावण्यात आले होते. मात्र मुश्रीफ यांच्या पोस्टरच्यावर भाजपा जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांचे एक पोस्टर लावण्यात आले होते. घाटगे-मुश्रीफ वाद हा काय कोणाला नवीन नाही. मात्र, मुश्रीफ आता भाजपसोबत आल्याने कोंडी झालेल्या समरजीतसिंह घाटगे यांनी काल कार्यकर्ता मेळावा घेत 2024 चा आमदार मीच असणार असे म्हणत आमदार हसन मुश्रीफ यांना आव्हानच दिले आहे. दरम्यान समरजीत सिंह घाटगे यांनी केलेल्या टीकांना मुश्रीफ आज कागलमध्ये काय उत्तर देणार याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.
हेही वाचा:
- Monsoon Session 2023 : विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून, मंत्रिमंडळ विस्तार गुलदस्त्यात
- Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधींच्या अडचणीत वाढ; मानहानीच्या खटल्यात गुजरात हायकोर्टाने ठोठावलेली शिक्षा कायम
- Sanjay Raut News: उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांना बोलण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही-संजय राऊत