कोल्हापूर Gautami Patil Programs : कोल्हापूर जिल्ह्यात गणेशोत्सवानिमित्त लावणी नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्ह्यातील दोन सार्वजनिक मंडळांनी याबाबत पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव ही परवानगी नाकारण्यात आलीय. याबाबतची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत दिलीय.
कार्यक्रमाला परवानगी नाकारली : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी आणि करवीर तालुक्यातील दोन सार्वजनिक मंडळांनी लावणी नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. याबाबतची परवानगी राधानगरी आणि इस्पुरली पोलीस ठाण्याकडे अर्ज करून मागविण्यात आली होती. मात्र, गणेशोत्सव काळात निर्विघ्नपणे उत्सव पार पडावा, यासाठी कोल्हापूर पोलीस दलाचे अधिकारी आणि कर्मचारी रस्त्यावर दिवस व रात्र पहारा देत आहेत. या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने लोक जमतात, अशा कार्यक्रमांना परवानगी देता येणार नाही. राज्यात यापूर्वीही गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांना हुल्लडबाजीचं गालबोट लागलं आहे. हा पूर्व अनुभव लक्षात घेता कोल्हापुरात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारण्यात आली आहे.
'या' ठिकाणी गौतमीच्या कार्यक्रमांना गालबोट : नाशिक, नांदेड, सातारा, परभणी या जिल्ह्यांमध्ये गौतमी पाटीलचे कार्यक्रम झाले. मात्र, या ठिकाणीही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केली. त्यामुळं कार्यक्रम थांबवण्याची वेळ आयोजकांवर आल्याच्या घटना घडल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेलगत असणाऱ्या वर्षभरापूर्वी बिरदेव यात्रेच्या निमित्तानं गौतमीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, कार्यक्रमाला दोन लाखाहून अधिक जमलेल्या जमावामुळे हाही कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला होता. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे पूर्व अनुभव पाहता सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यात होणाऱ्या दोन्हीही कार्यक्रमांना परवानगी नाकारलीय.
नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळं चर्चेत : गौतमी पाटील नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळं चर्चेत असते. तिच्या कार्यक्रमांमध्ये राडा होणं, ही अगदी सामान्य बाब झालीय. काही दिवसांपूर्वीच तिच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यानंतर ती लगेच दहीहंडीच्या कार्यक्रमात दिसून आली. या अगोदर तिचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. तरुणाईमध्ये गौतमीची चांगलंच क्रेझ असल्याचं दिसून येतंय.
हेही वाचा :