ETV Bharat / state

Big Plane Landed : काय सांगताय... कोल्हापुरात पहिल्यांदाच उतरलं भलं मोठं विमान - big plane

कोल्हापूर विमानतळाच्या (Kolhapur Airport) दृष्टीकोनातून आज एक महत्वाचा दिवस (First time big plane Embarr E195 E2 Profit Hunter landed) आहे. आज असे काय झाले? , ते जाणुन घेऊया.

Big Plane Landed
एमबरर E195-E2 प्रॉफिट हंटर
author img

By

Published : Nov 22, 2022, 4:14 PM IST

Updated : Nov 28, 2022, 2:12 PM IST

कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळाच्या दृष्टीकोनातून आज एक आनंदाची आणि ऐतिहासिक बातमी आहे ती म्हणजे आज दुपारी आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठे विमान इथे उतरले. या भल्या मोठ्या Embraer E195 प्रॉफिट हंटर विमानाचे आगमन आज दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी कोल्हापूरात झाले. विशेष म्हणजे हे आजपर्यंत कोल्हापूरात उतरलेल्या विमानांपैकी हे सर्वात मोठं विमान आहे. त्यामुळे भविष्यात कोल्हापूर विमानतळाच्या दृष्टिकोनातून ही महत्त्वाची घटना आहे. शिवाय कोल्हापूर विमानतळावर अशाच पद्धतीची अनेक विमाने यापुढच्या काळात उतरतील अशी खात्री झाली आहे. जवळपास दीड दोन तासांनंतर या विमानाने पुन्हा उड्डाण घेतले.

विमानतळावर मोठे बदल; मोठ्या अपेक्षा :कोल्हापूर विमानतळ येथे सातत्याने विविध सुधारणा होत असून एक उत्कृष्ट दर्जाचे विमानतळ इथे बनत आहे. गेल्या 18 महिन्यांत विमानतळाने भूसंपादनाचा भाग, धावपट्टीचा विस्तार, नाईट लँडिंगची काही कामे यशस्वीपणे पूर्ण केली आहेत. या वर्षभरात कोल्हापूर विमानतळावर छोटी विमाने ये-जा करत आहेत. धावपट्टीची लांबी 1930 मीटर अशी मोठी झाल्याने आणि नाईट लँडिंगची परवानगी मिळाल्याने कोल्हापुरात मोठ्या विमानांची अपेक्षा करणे शक्य झाले आहे. विशेष म्हणजे स्वतः महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रायव्हेट विमानाद्वारे नाईट लँडिंग सुविधेचे उद्घाटन केले. त्यामुळे आता कोल्हापुरातील लोक मोठ्या विमानांच्याही प्रतीक्षेत आहेत.

एमबरर प्रॉफिट हंट

असे होते आज उतरलेले प्रॉफिट हंटर नावाचे एम्ब्रेर E-195-E2 विमान : अजूनही बऱ्याच सुधारणा होणे अपेक्षित असले तरी सध्यस्थीत अनेक मार्गावर विमानसेवा सुरू आहे. भविष्यात इथे अनेक मेट्रो सिटी जोडण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र या सर्वांमध्ये कोल्हापूर विमानतळासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान कोल्हापुरात उतरले आहे आणि त्यामुळे लवकरच A320 किंवा B737 सारख्या मोठ्या विमानांचे युग सुरू झाले आहे असे म्हणायला काही हरकत नाही. प्रॉफिट हंटर नावाचे एम्ब्रेर E-195-E2 विमान दुपारी 3.20 च्या सुमारास कोल्हापूर विमानतळावर उतरले. यावेळी स्टार एअर चे संजय घोडवत, श्रेणीक घोडवत उपस्थित होते. अतिशय खास असे हे विमान होते. 2 बाय 2 सीटर फॉरमॅट, 146 प्रवाशांपर्यंतची क्षमता आणि एका उड्डाणात ते जवळपास 4 हजार 500 किलोमीटरचा प्रवास करू शकते. दरम्यान, कोल्हापूर विमानतळावर प्रवाशांचा प्रतिसाद पाहून इथे आणखी काही मार्ग सुरू करण्याबाबत मागणी वाढत असल्याने यापुढच्या काळात यासह अशी E-195 सारखी विमाने सुद्धा भविष्यात मोठ्या प्रमाणात दिसण्याची शक्यता आहे.

Last Updated : Nov 28, 2022, 2:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.