कोल्हापूर - जिल्ह्यामध्ये 15 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात केवळ 34 पॉझिटिव्ह रुग्ण उरले आहेत. तर जिल्ह्यात सोमवारी 3 आणखी पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 741 झाली आहे तर 699 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात आता केवळ 34 रुग्ण उरले असल्याने कोल्हापूरसाठी मोठी दिलासादायक बाब आहे.
आत्तापर्यंत जिल्ह्यात 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सोमवारी आढळलेले रुग्ण आजरा, गडहिंग्लज आणि गगनबावडा प्रत्येक 1 असे एकूण 3 जण आढळले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक बी. सी. केम्पी-पाटील यांनी दिली आहे.
कोल्हापूरात आत्तापर्यंत आढळले रुग्ण वयोगटानुसार -
1 वर्षाच्या आतील : 2
1 ते 10 वर्ष : 58
11 ते 20 वर्ष : 89
21 ते 50 वर्ष : 486
51 ते 70 वर्ष : 100
71 वर्षांवरील : 6
असे एकूण : 741 रुग्ण
डिस्चार्ज : 699
मृत्यू : 8
अॅक्टिव्ह रुग्ण : 34