ETV Bharat / state

मिळेल त्या साधनाने...मिळेल त्या मार्गाने... प्रत्येकजण करतोय पूरग्रस्तांना मदत ! - NDRF kolhapur

लष्कर, एनडीआरएफ, नौदल, जिल्हा प्रशासन, एसडीआरएफ, लोकप्रतिनिधी, सेवाभावी संस्था, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नागरिक हे सगळेच मिळेल त्या साधनाने अडचणीत सापडलेल्या पूरग्रस्तांच्या मदतीला धावले आहेत.

कोणी तराफ्यावरून, दोरीच्या सहाय्याने, प्लास्टिक खुर्चीच्या मदतीने तर कोणी प्लास्टिक बॅरेलच्या साहाय्याने पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी पोहोचवत आहेत.
author img

By

Published : Aug 9, 2019, 11:54 PM IST

कोल्हापूर - लष्कर, एनडीआरएफ, नौदल, जिल्हा प्रशासन, एसडीआरएफ, लोकप्रतिनिधी, सेवाभावी संस्था, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नागरिक हे सगळेच मिळेल त्या साधनाने अडचणीत सापडलेल्या पूरग्रस्तांच्या मदतीला धावले आहेत. कोणी तराफ्यावरून, दोरीच्या सहाय्याने, प्लास्टिक खुर्चीच्या मदतीने तर कोणी प्लास्टिक बॅरेलच्या साहाय्याने पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी पोहोचवत आहेत.

cdcd
काही ठिकाणी प्लास्टिक खुर्च्यांच्या माध्यमातून वृध्दांना पाण्यातून बाहेर काढले आहे.

टाकवडे गावातील 'आधार रेस्क्यू फोर्स'ने ग्रामस्थांच्या मदतीने शिरोळ तालुक्यातील शिरढोण येथील पूरग्रस्तांना तराफ्यावरून बाहेर काढले आहे. तसेच या तालुक्यातील कुरूंदवाड, बहिरेवाडी येथे एनडीआरएफचे पथक पूरग्रस्तांना बोटीच्या साहाय्याने बाहेर काढत आहे. भुदरगड तालुक्यातील मडुर, वासनोली, पाळ्याचा हुडा, चोपडेवाडी येथील चार गरोदर महिलांना यांत्रिक बोटीद्वारे ग्रामीण रूग्णालयात सुखरूप दाखल करण्यात आले.

xvdv
हातकणंगले तालुक्यातील निलेवाडीत अतिशय प्रतिकूल परिस्थितीत रेस्क्यू यंत्रणा पार पाडावी लागली.

हातकणंगले तालुक्यातील निलेवाडीत अतिशय प्रतिकूल परिस्थितीत रेस्क्यू यंत्रणा पार पाडावी लागली. मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक कर्मचाऱ्यांनी गावात थांबून दोरीच्या साहाय्याने पूरग्रस्तांची सुटका केली. राज्य परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्लास्टिकचे बॅरेल आणि बांबूपासून तराफा बनवून स्थानिक तरूणांच्या सहकार्याने पूरग्रस्तांची सुटका केली. तसेच काही ठिकाणी प्लास्टिक खुर्च्यांच्या माध्यमातून वृध्दांना पाण्यातून बाहेर काढले आहे. आंबेवाडीमध्ये अडकलेल्या लोकांना चेअर नॉटच्या मदतीने दुसऱ्या मजल्यावरून आपत्ती व्यवस्थापकांनी सोडवले.

sdvv
भुदरगड तालुक्यातील मडुर, वासनोली, पाळ्याचा हुडा, चोपडेवाडी येथील चार गरोदर महिलांना यांत्रिक बोटीद्वारे ग्रामीण रूग्णालयात सुखरूप दाखल करण्यात आले.

शहरातील विविध ठिकाणच्या शिबीरांमध्ये पूरग्रस्तांसाठी भोजन, निवास आदीची सोय सेवाभावी संस्थांनी केली आहे. यामध्ये शिरोली मधील मदरसाही सहभागी झाला आहे. सोशल मीडिया वरूनही विविध सेवाभावी संस्था आणि युवक मंडळांनी, पत्रकारांनी मदतीबाबत आपला सहभाग नोंदवला आहे. चादरी, भोजन, पाणी, औषधे,इ मदत देण्याबाबत विविध संपर्क क्रमांकांच्या पोस्ट व्हायरल केल्या आहेत. जिल्ह्यातील या नैसर्गिक आपत्तीत सर्वच यंत्रणांनी जमेल त्या मार्गाने आपला सहभाग नोंदवला आहे.

Intro:अँकर : लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफ, नौदल, जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी, सेवाभावी संस्था, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नागरिक हे सगळेच मिळेल त्या साधनाने अडचणीत सापडलेल्या पूरग्रस्तांच्या मदतीला धावले आहेत. कुणी तराफ्यावरून, दोरीच्या सहाय्याने, प्लास्टिक खुर्चीच्या मदतीने तर कुणी प्लास्टिक बॅरेलच्या सहाय्याने पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवत आहेत.Body:व्हीओ : टाकवडे येथील आधार रेस्क्यू फोर्सने ग्रामस्थांच्या मदतीने शिरोळ तालुक्यातील शिरढोण येथील पूरग्रस्तांना तराफ्यावरून बाहेर काढले आहे. शिरोळ तालुक्यातील कुरूंदवाड, बहिरेवाडी येथे एनडीआरएफ पूरग्रस्तांना बोटीच्या सहाय्याने बाहेर काढत आहेत. भुदरगड तालुक्यातील मडुर, वासनोली, पाळ्याचा हुडा, चोपडेवाडी येथील चार गरोदर महिलांना यांत्रिक बोटीचा वापर करून गारगोटी येथील ग्रामीण रूग्णालयात सुखरूप दाखल करण्यात आले.
हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी येथील अतिशय प्रतिकूल परिस्थितीत रेस्क्यू यंत्रणा पार पाडावी लागली. मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक या महिला कर्मचाऱ्यांनी गावात थांबून दोरीच्या सहाय्याने पूरग्रस्तांची सुटका केली. एसटी परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्लास्टिकचे बॅरेल आणि बांबूपासून तराफा बनवून स्थानिक तरूणांच्या सहकार्याने पूरग्रस्तांची सुटका केली आहे. तर काही ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या प्लास्टिक खुर्चीच्या माध्यमातून वृध्दांना पाण्यातून बाहेर काढले आहे. आंबेवाडीमध्ये अडकलेल्या लोकांना चेअर नॉटच्या सहाय्याने दुसऱ्या मजल्यावरून आपत्ती व्यवस्थापकांनी रोप रेस्क्यू केला. शिरोळ तालुक्यातील राजापूर येथे नौदलाच्या पथकाने रेस्क्यू ऑपरेशन राबविले आहे. शहरातील विविध ठिकाणी सेवाभावी संस्थांनी शिबीरांमध्ये पूरग्रस्तांसाठी भोजन, निवास आदीची सोय केली आहे. त्यामध्ये शिरोली मधील मदरसाही सहभागी झाला आहे. सोशल मीडिया, व्हॉट्अॅप, फेसबुक, टेलिग्राम, व्टिटर या समाज माध्यमांवरूनही विविध सेवाभावी संस्था आणि युवक मंडळांनी, पत्रकारांनी मदतीबाबत आपला सहभाग नोंदवला आहे. विशेषत: चादरी, भोजन, पाणी, औषधे आदीची मदत देण्याबाबत विविध संपर्क क्रमांक याबाबतच्या पोस्ट व्हायरल केल्या आहेत. त्याचबरोबर प्रत्यक्ष सहभागही नोंदवला आहे. कोल्हापूरात आलेल्या या नैसर्गिक आपत्तीत सर्वच यंत्रणांनी जमेल त्या मार्गाने आपला सहभाग नोंदवला आहे. Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.