ETV Bharat / state

Kolhapur News: कोल्हापुरात पंचमहाभूत लोकोत्सवात गाढवांच्या प्रदर्शनाने वेधले लक्ष - गढवांच्या प्रदर्शनाबरोबरच सौंदर्य स्पर्धा

आपण आजपर्यंत कुत्र्यांची, मांजरांची, घोड्यांची प्रदर्शन झालेली पाहिली असेल मात्र कधी गाढवाचं प्रदर्शन तुम्ही पाहिल आहे का नाही ना? देशातील पहिल गाढवांच प्रदर्शन कोल्हापुरात भरले आहे. कोल्हापुरातील कनेरी मठ येथे होत असलेल्या सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात हे अनोखे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. गाढवांच्या प्रदर्शनाबरोबरच सौंदर्य स्पर्धा ही भरवण्यात आले आहेत. तर या स्पर्धेत तब्बल 69 लाखांची बक्षीसही ठेवण्यात आले आहे.

Donkey Exhibition
गाढवांच्या प्रदर्शनाने वेधले लक्ष
author img

By

Published : Feb 24, 2023, 10:27 AM IST

Updated : Feb 24, 2023, 2:28 PM IST

गाढवांच्या प्रदर्शनाने वेधले लक्ष

कोल्हापूर: गाढव हा अतिशय उपयुक्त प्राणी आहे. गाढवीनच दूध हे अन्य प्राण्यांच्या दुधापेक्षा महाग आणि दुर्मिळ असल्याने यापासून सौंदर्य प्रसाधन तयार केले जातात. मात्र असे असले तरी, सध्या गाढव प्रजाती दुर्मिळ होत चालले आहे. गाढवाचे संवर्धन करणे गरजेचे आहे. यामुळे त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र व पशुसंवर्धन विभागाच्यावतीने पंचमहाभूत लोकोत्सवात जनावरांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. हे प्रदर्शन 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान भरवण्यात आले होते. यामध्ये देशी प्रजातींच्या गाय, म्हशी, बकरी, अश्व, गाढव, कुत्रे व मांजर यांचाही समावेश करण्यात आला होता. तर हे प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकरी वर्गासह विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती.

गाढवांसाठी प्रदर्शन: शिवाय या प्रदर्शनात केवळ जनावरच पाहता येणार नाही तर, त्यांच्याबद्दलची माहिती आणि जनावाराची सौंदर्य स्पर्धाही पार पडली. कणेरी मठावर नेहमीच देशी जनावरांचे काळजी घेत देशी प्रजातीची वाढ कशी होईल याचा प्रयत्न सुरू असतो. मठात देशी गाईंची गोशाळा, भटक्या कुत्र्यांची शाळा देखील सुरू आहे. येथे हजारो रस्त्यावरील मोकाट कुत्रे ठेवण्यात आली आहे. शिवाय दोन वेळेचे जेवण औषधोपचार या केले जाते. मात्र आता गाई म्हशी कुत्र्यानप्रमाणे गाढवाची प्रजातीची वाढ व्हावी म्हणून विशेष स्वरूपात गाढवांसाठी प्रदर्शन भरवण्यात आले

लाखोंची बक्षिसे आणि पुरस्कार जाहीर: तीन दिवस भरणाऱ्या या प्रदर्शनात गाय, म्हशी, बकरी, घोडे, गाढव, कुत्रे व मांजर यांचा सहभाग असून यासाठी मठावरील मैदानात भव्य मंडप उभारण्यात आला होता. सर्वोत्कृष्ट गाय आणि बैलाला एक लाखाचे तर म्हैस व रेड्याला ५१ हजारांचे बक्षीस देण्यात आले होते. देशी घोडा स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या घोड्यास 1 लाखाचे बक्षीस देण्यात येणार आहेत. तर गाढवांच्या प्रदर्शनात सौंदर्य स्पर्धा आणि त्यावर ही लाखोंची बक्षिसे आणि पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. सध्या या प्रदर्शनाची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. या प्रदर्शनाला नागरिकांचा देखील मोठा प्रतिसाद दिला आहे.

गाढवाचा उपयोग: मादी गाढव दिवसाला १ लिटर दूध देते. याची किंमत प्रतिलिटर ७ ते १० हजार रुपये प्रति लिटर आहे. गाढवाच्या दुधाचा उपयोग सौंदर्यप्रसाधने बनवण्यासाठी केला जातो. ज्या लोकांना लॅक्टोजची अलर्जी आहे, त्यांच्यासाठी हे दूध उपयुक्त ठरते. गाढवाच्या दुधातील प्रथिने हे प्रतिजैविक स्वरूपात असतात. त्यामुळे विषाणू आणि जिवांणूमुळे होणारे पोटाचे विकार कमी होतात. या दुधामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. रक्ताभिसरण चांगले होते.

हेही वाचा: Shiv Era Martial Act कोल्हापूरात एकेकाळी व्हायच्या फरी गदकाच्या भव्य स्पर्धा पाहूया काय होता हा खेळ

Last Updated : Feb 24, 2023, 2:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.