ETV Bharat / state

Fatal accident on highway : मृत्यू वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा - accident on junoni highway

कार्तिकी यात्रेसाठी ( Kartiki Yatra ) निघेलेल्या वारीत भरधाव गाडी घुसल्याने जुनोनी येथे महामार्गावर भीषण अपघात (Fatal accident on highway at Junoni ) झाला आहे.

Chief Minister
मुख्यमंत्र्यांची घोषणा
author img

By

Published : Nov 1, 2022, 8:02 AM IST

Updated : Nov 1, 2022, 8:50 AM IST

कोल्हापूर : कार्तिकी यात्रेसाठी ( Kartiki Yatra ) निघेलेल्या वारीत भरधाव गाडी घुसल्याने 8 वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर 6 जण जखमी झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील जुनोनी येथे महामार्गावर हा भीषण अपघात झाला आहे. मृत हे कोल्हापूर जिल्ह्यातील जठारवाडी येथील आहेत.

५ महिला, २ पुरुष आणि एक लहान मुलाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती : पंढरपूरला पायी निघालेल्या वारकऱ्यांवर काळाचा घाला पडला आहे. दिंडीत कार घुसल्याने ८ वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ६ जण गंभीर जखमी झाले असून जखमींना सांगोला येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कार्तिक यात्रेच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यातल्या जठारवाडी येथील वारकरी पायी पंढरपूर कडे निघाले होते. सायंकाळी सातच्या दरम्यान दिंडी सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यातील जुनोनी जवळ पोहोचली होती. त्याचवेळी मिरज पंढरपूर मार्गावर मिरजेकडून येणार एका भरधाव गाडी त्या दिंडीमध्ये मागून येऊन घुसली आणि वारकऱ्यांना चिरडत पुढे जाऊन थांबली. विठुरायाचे भक्तीत तल्लीन असलेल्या भक्तांना काही कळायच्या आता घडलेल्या घटनेत आठ जण हे जागीच ठार झाले. ज्यामध्ये ५ महिला, २ पुरुष आणि एक लहान मुलाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तर काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. या दिंडीमध्ये 32 जण विठुरायाच्या दर्शनासाठी पायी निघाले होते.

जठारवाडी गाव शोकसागरात बुडाले; अनेकजण सांगोल्याकडे रवाना : या भीषण अपघाताची माहिती मिळताच कोल्हापूरातील जठारवाडी गाव शोकसागरात बुडाले आहे. अपघातामधील मृतांची नावं अद्याप समजू शकली नाही आहेत. त्यामुळे गावातील लोकांची घालमेल सुरु आहे. काही ग्रामस्थ अपघाताची माहिती मिळताच सांगोल्याकडे रवाना झाले आहेत.

कारचालकाला घेतले ताब्यात : अपघाताला कारणीभूत असणाऱ्या कार चालकाला सांगोला पोलिसांनी ताब्यात घेतले असून हि कार सांगोला तालुक्यातील सोनंद गावातील असल्याचे समजत आहे. त्यानुसार पोलीस पुढील तापास करत आहेत.

Last Updated : Nov 1, 2022, 8:50 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.