कोल्हापूर - चिकनमुळे कोरोना व्हायरस होतो, अशा अफवांचे संदेश गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे चिकनची विक्री घटत आहे. यामुळेच पोल्ट्री व्यवसायिकांवर आता रस्त्यावर सेल लावल्याप्रमाणे कोंबड्या विकण्याची वेळ आली आहे.
हेही वाचा... 'कोरोना' प्रभाव! ८० रुपये किलोचे चिकन डावलून खवय्यांची ६०० रुपये किलोच्या मटणाला पसंती
कोल्हापूरात शंभरला पाच कोंबड्या... तर काही ठिकाणी दोनशेला पाच कोंबड्या
कोरोना व्हायरसमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील चिकन विक्रेत्यांचे कंबरडे मोडल्याचे दिसत आहे. त्यामुळे विक्रेत्यांनी आता अक्षरशः कोंबड्यांचा सेल लावण्याचा सपाटाच लावला आहे. कालपर्यंत दोनशेला 5 अशा पद्धतीने कोंबड्या विकल्या जात होत्या. आता चक्क शंभर रुपयांना 5 अशा पद्धतीने कोंबड्या विकल्या जात आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील एका व्हिडीओतून हा प्रकार समोर आला आहे. तसाच प्रकारच सेल सेनापती कापशी या गावातही लागल्याचे दिसत आहे. एकंदरीत या व्हिडीओतून पोल्ट्री व्यवसायींकावर कोसळलेल्या संकटाची जाणीव होऊ शकते.