ETV Bharat / state

कोरोना इफेक्ट : अंबाबाई मंदिरात जाण्यापूर्वी भाविकांच्या हाताला 'सॅनिटायझर' - सॅनिटायझर

कोरोनाबाबात खबरदारी घेत कोल्हापुरातील अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकांच्या हातावर सॅनिटायझर लावूनच त्यांना दर्शनासाठी सोडले जात आहे.

भाविकांना सॅनिटायझर लावताना
भाविकांना सॅनिटायझर लावताना
author img

By

Published : Mar 10, 2020, 4:45 PM IST

Updated : Mar 10, 2020, 5:14 PM IST

कोल्हापूर - कोरोना विषाणूने जगभरात धुमाकूळ घातला आहे. बघता बघता भारतात सुद्धा कोरोनाचे 47 रुग्ण आढळले आहेत. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात खबरदारी घेतली जात आहे. अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकांच्या हातावर सॅनिटायझर लावूनच त्यांना दर्शनासाठी सोडले जात आहे. आज सकाळपासून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून अशा प्रकारे खबरदारी घेतली जात आहे.

अंबाबाई मंदिरात जाण्यापूर्वी भाविकांच्या हाताला 'सॅनिटायझर'

अंबाबाई मंदिरात येणाऱ्या प्रत्येक दरवाजासमोर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून प्रत्येक भाविकाच्या हाताला सॅनिटायझर लावून आपले हात स्वच्छ ठेवा, अशा सूचना सुरक्षा रक्षक आणि पोलीस कर्मचारी देत आहेत. भाविकही खबरदारी घेत तोंडाला मासक लावून दर्शनासाठी येत आहेत. दिवसभरातून तीनवेळा मंदिर स्वच्छ केले जात आहे. त्यामुळे मंदिर समितीने घेतलेल्या या खबरदारीमुळे भाविकांतूनही समाधान व्यक्त होत आहेत.

हेही वाचा - कोरोना इफेक्ट : कोल्हापुरात चक्क कोंबड्यांचा सेल; 200 रुपयांना 'इतक्या' कोंबड्या

Last Updated : Mar 10, 2020, 5:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.