ETV Bharat / state

Jayprabha Studio Issue : सुरेल गाण्याच्या माध्यमातून 'जयप्रभा बचावो' म्हणत चौथ्या दिवशीही उपोषण सुरूच - जयप्रभा स्टुडिओ प्रकरण अपडेट

खिल भारतीय मराठी चित्रपट महासंघाने गेल्या ४ दिवसांपासून जयप्रभा स्टुडिओच्या दरात बेमुदत साखळी उपोषण सुरू केलं आहे. ( Jayprabha Studio Agitation ) जयप्रभा स्टुडिओची 2 वर्षापूर्वीच विक्री झाल्याने कोल्हापूरकर आणि कलाकार आक्रमक झाले आहेत. दरम्यान, चित्रपट महामंडळाने जोपर्यंत स्टुडिओ पुन्हा मिळत नाही आणि चित्रीकरण पुन्हा सुरू होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे.

agitation continue for jayprabha studio in kolhapur
सुरेल गाण्याच्या माध्यमातून 'जयप्रभा बचावो' म्हणत चौथ्या दिवशीही उपोषण सुरूच
author img

By

Published : Feb 16, 2022, 8:17 PM IST

कोल्हापूर - अखिल भारतीय मराठी चित्रपट महासंघाने गेल्या ४ दिवसांपासून जयप्रभा स्टुडिओच्या दरात बेमुदत साखळी उपोषण सुरू केलं आहे. ( Jayprabha Studio Agitation ) जयप्रभा स्टुडिओची 2 वर्षापूर्वीच विक्री झाल्याने कोल्हापूरकर आणि कलाकार आक्रमक झाले आहेत. दरम्यान, चित्रपट महामंडळाने जोपर्यंत स्टुडिओ पुन्हा मिळत नाही आणि चित्रीकरण पुन्हा सुरू होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे.

जयप्रभा स्टुडिओसाठी उपोषण...

आज (बुधवारी) कलाकारांनी आणि झंकार ऑर्केस्ट्रा एकत्र येत भालजी पेंढारकर यांना जयप्रभा स्टुडिओ येथे चित्रित झालेल्या गाण्याच्या माध्यमातून मानवंदना देत उपोषणाच्या चौथ्या दिवसाची सुरुवात केली आहे. तसेच रोज वेगवेगळ्या माध्यमातून कलाकार आपली कला सादर करत हे आंदोलन पुढे नेणार असल्याचे सांगितले आहेत. तसेच या उपोषणास अनेक संघटनांचा पाठिंबा देखील मिळत गेल्या 3 दिवसात वेगवेगळे पक्ष संघटनांनी येथे येऊन जाहीर पाठिंबा दर्शवत आंदोलनात सहभागी घेतला आहे. जयप्रभा स्टुडिओ ताब्यात घेऊन कोल्हापूरचे वैभव जतन करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

सुरेल गाण्याच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधले -

जयप्रभा स्टुडिओसमोर सुरू असलेल्या बेमुदत उपोषच्या चौथा दिवशी कलाकारांनी आपली कला सादर करत भालजी पेंढारकर यांना जयपर्भा स्टुडिओ येथे चित्रित झालेल्या विविध गाण्याच्या माध्यमातून मानवंदना दिली गेल्या अनेक वर्षापासून कोल्हापुरातील नामवंत आणि अनेक चित्रपटात संगीत दिलेल्या झंकार ऑर्केस्ट्राने ढोलकीच्या तालावर सुरांच्या साहाय्याने परिसर मंत्रमुग्ध केले तसेच अनेक कलाकारांनी नृत्य सादर करत हे आगळेवेगळे उपोषण सुरू ठेवले आहे.तसेच सरकारचे लक्ष वेधून घेतले आहे. दरम्यान, यावर आता जिल्ह्यातील अनेक नेत्यांची देखील प्रतिक्रिया येत असून पालकमंत्र्यांनी देखील शासनस्तरावर विक्री झालेल्या स्टुडिओची किंमत ठरवून ती पुन्हा ताब्यात घेता येते का हे सुद्ध पाहू असे आश्वासन दिले आहे.

हेही वाचा - Maratha Reservation : मराठा आरक्षणप्रश्नी छत्रपती संभाजीराजे पुन्हा मैदानात! 26 फेब्रुवारीपासून उपोषण

काय आहे प्रकरण?

कोल्हापुरची अस्मिता आणि भालजी पेंढारकर यांच्या कार्याची एकमेव आठवण असलेल्या जयप्रभा स्टुडिओची तब्बल 6 कोटी 50 लाखांना विक्री झाली आहे. कोल्हापुरकरांनी लता मंगेशकर यांच्याविरोधात जाऊन जागा विक्री विरोधात लढा दिला होता. त्याच कोल्हापुरकरांच्या डोळ्यात धूळ फेकत ही जागा दोन वर्षांपूर्वीच विक्री झाल्याचे उघड होते. जी जागा हेरिटेज वास्तू मध्ये होती. त्याचीच विक्री झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

या आहेत मागण्या -

  1. जयप्रभा स्टुडिओ चित्रीकरणासाठी तात्काळ खुला झाला पाहिजे
  2. जयप्रभा स्टुडिओ मधील इमारतीसह खुली जागा आरक्षित रहावी व चित्रीकरण या व्यतिरिक्त त्याचा कोणताही व्यावसायिक वापर होऊ नये
  3. कोल्हापूर महानगरपालिकेने जयप्रभा स्टुडिओच्या व्यावसायिकीकरण/वाणिज्य वापरासाठी परवानगी देऊ नये
  4. जयप्रभा स्टुडिओ याचे जतन होण्याकरिता शासनाने व कोल्हापूर महानगर पालिकेने लक्ष घालावे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.