कोल्हापूर - कोल्हापूर उत्तर विधानसभा पोट निवडणुकीचे ( North Kolhapur by Election ) एकूण 357 केंद्रांवर मंगळवारी ( दि. 12 एप्रिली ) मतदान ( Kolhapur Election Update ) होत आहे. यासाठी प्रशासन सज्ज झाले असून आज मतपेट्या तसेच इतर साहित्य घेऊन कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना झाले ( Kolhapur By Election Update ) आहेत. एकूण 2 हजार 400 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. प्रशासनाने याची संपूर्ण तयारी केली असून संवेदनशील केंद्रांवर जादाचा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. या मतदारसंघात एकूण 2 लाख 91 हजार 798 इतके मतदार मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. यासाठी एकूण 1 हजार 541 ईव्हीएम मशीन वापरले जाणार आहेत. सोमवारी (दि. 10 एप्रिल) येथील विवेकानंद महाविद्यालयाच्या पटांगणावरून निवडणूक कर्मचारी निवडणुकीचे साहित्य घेऊन रवाना झाले आहेत.
दिव्यांग तसेच वयोवृद्ध मतदारांसाठी रिक्षा - कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात 11 हजार 263 इतके वयोवृद्ध मतदार आहेत. तसेच काही दिव्यांग मतदार आहेत. त्यांच्या मतदानासाठी प्रशासनाने विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एकूण 47 रिक्षा यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत.
- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात असे आहेत मतदार
- पुरुष मतदार - 1 लाख 45 हजार 768
- स्त्री मतदार - 1 लाख 46 हजार 18
- तृतीयपंथी मतदार - 12
- एकूण मतदार - 2 लाख 91 हजार 798
- वयोगटानुसार खालीलप्रमाणे मतदार
- वय वर्षे 18-19 - 3 हजार 82
- वय वर्षे 20-29 - 46 हजार 459
- वय वर्षे 30-39 - 59 हजार 381
- वय वर्षे 40-49 - 61 हजार 658
- वय वर्षे 50-59 - 53 हजार 157
- वय वर्षे 60-69 - 36 हजार 302
- वय वर्षे 70-79 - 20 हजार 496
- 80 वर्षांवरील - 11 हजार 263