ETV Bharat / state

कोल्हापुरात विवाहितेची दोन मुलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

शिल्पा ही दोन दिवसांपूर्वी आपल्या माहेरी केर्ली या गावी आली होती. काल सायंकाळपासून शिल्पा आपल्या मुलींसोबत बेपत्ता होती. तिचा शोध सुरू असतानाच गावातील एका विहिरीत दोन मुलींसह शिल्पाचा मृतदेह आढळून आला.

kolhapur
मृत विवाहिता व तिच्या मुलींचे दृश्य
author img

By

Published : Dec 16, 2019, 11:41 PM IST

Updated : Dec 17, 2019, 7:37 AM IST

कोल्हापूर - करवीर तालुक्यातील केर्ली येथील एका विवाहितेने आपल्या दोन मुलींसही विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली . शिल्पा नागेश चव्हाण असे मृत विवाहितेचे नाव असून वैभवी (वय ६ वर्षे) आणि देवयानी (वय ८ वर्षे) असे मृत मुलींची नावे आहेत. सदर घटनेची करवीर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

शिल्पाचा दहा वर्षांपूर्वी शिंगणापूर येथील नागेश चव्हाण यांच्याशी विवाह झाला होता. शिल्पा या एका हॉटेलमध्ये सुरक्षा रक्षकाची नोकरी करत होत्या. तर नागेश हा गावात चप्पल शिवणे व शासकीय दाखले काढून देण्याचे काम करत होता. शिल्पा ही दोन दिवसांपूर्वी आपल्या माहेरी केर्ली या गावी आली होती. काल सायंकाळपासून शिल्पा आपल्या मुलींसोबत बेपत्ता होती. तिचा शोध सुरू असतानाच गावातील एका विहिरीत दोन मुलींसह शिल्पाचा मृतदेह आढळून आला. मोठी मुलगी देवीयानी ही इयत्ता दुसरीमध्ये तर वैभवी अंगणवाडीत शिकत होती. शिल्पाच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा- कोल्हापूरच्या सुपुत्राला जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण

Intro:कोल्हापूर- कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील केर्ली येथील शिल्पा चव्हाण या विवाहितेने आपल्या माहेरी दोन मुलींसह उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सदरच्या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.Body:व्हीओ : करवीर तालुक्यातील केर्ली येथील शिल्पा नागेश चव्हाण या विवाहितेने आपल्या दोन मुली देवयानी वय वर्ष ८ व वैभवी वय वर्ष ६ यांना सोबत घेऊन गावातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. शिल्पा हिचा विवाह दहा वर्षांपूर्वी शिंगणापूर नागेश चव्हाण यांच्याशी झाला होता. शिल्पा या एका हॉटेलमध्ये सेक्युरिटी गार्ड चे काम करत होत्या. तर नागेश हा गावात चप्पल शिवणे व शासकीय दाखले काढून देण्याचे काम करत होता शिल्पा ही दोन दिवसांपूर्वी आपल्या माहेरी केर्ली गावी आली होती. काल सायंकाळपासून शिल्पा मुलींसोबत बेपत्ता होती. तिचा शोध सुरू असतानाच गावातील एका विहिरीत दोन मुलीसह शिल्पाचा मृतदेह आढळून आला. मोठी मुलगी देवीयानी ही इयत्ता दुसरी मध्ये तर वैभवी अंगणवाडी शिकत होती. माय लेकींच्‍या अशा मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे पण शिल्पाच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही..Conclusion:.
Last Updated : Dec 17, 2019, 7:37 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.