कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले आहेत. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात तब्बल 784 नवे रुग्ण तर 31 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 357 जणांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 6 हजार 613 वर पोहोचली आहे. तर आजपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या 62 हजार 3 इतकी झाली आहे.
जिल्ह्यातील एकूण कोरोना आकडेवारीवर एक नजर -
कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 62 हजार 3वर पोहोचली आहे. त्यातील 53 हजार 351 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 1 जानेवारी 2021 रोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 39 इतकी होती. तर एकूण 1 हजार 708 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आज रोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 6 हजार 613 वर पोहोचली असून एकूण मृतांची संख्या 2 हजार 39 झाली आहे.
वयोगटानुसार रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -
1 वर्षाखालील - 77 रुग्ण
1 ते 10 वर्ष - 2243 रुग्ण
11 ते 20 वर्ष - 4349 रुग्ण
21 ते 50 वर्ष - 33549 रुग्ण
51 ते 70 वर्ष -17390 रुग्ण
71 वर्षांवरील - 4395 रुग्ण, जिल्ह्यात असे एकूण 62 हजार 3 रुग्ण झाले आहेत.
तालुक्यानुसार रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -
1) आजरा - 1167
2) भुदरगड - 1492
3) चंदगड - 1342
4) गडहिंग्लज - 1919
5) गगनबावडा - 199
6) हातकणंगले - 6353
7) कागल - 1880
8) करवीर - 6968
9) पन्हाळा - 2267
10) राधानगरी - 1416
11) शाहूवाडी - 1628
12) शिरोळ - 2978
13) नगरपालिका कार्यक्षेत्रातील - 8927
14) कोल्हापुर महानगरपालिका - 20082
15) इतर जिल्ह्यातील, राज्यातील - 3385