ETV Bharat / state

गडहिंग्लज : ७५ वर्षीय आजीबाई ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात - आजीबाई ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात

मुलाने निवडणूक लढविण्यासाठी सहमती दर्शविल्यानंतर त्या थेट उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लगबगीने पोहचल्या. यावेळी त्यांनी लोकांची कामे करायला निवडून यायचे असल्याची इच्छा बोलून दाखवली.

कोल्हापूर
कोल्हापूर
author img

By

Published : Jan 1, 2021, 10:04 PM IST

Updated : Jan 1, 2021, 10:48 PM IST

कोल्हापूर - सध्या राज्यात हजारो ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. हजारो उमेदवार नशीब अजमावत आहेत. या उमेदवारांमध्ये लक्ष वेधून घेतलंय ते कोल्हापूर जिल्ह्यातील गिजवणे गावच्या 75 वर्षीय हौसाबाई कांबळे यांनी. त्या देवदासी असल्याने जोगवा मागून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शाळेची पायरीही न चढलेल्या हौसाबाईंना निवडणूक लढण्याची हौस आहे. तीही गावाच्या विकासासाठी. गिजवणेची ग्रामपंचायत 1952 ला स्थापन झाली, त्याही अगोदर हौसाबाई कांबळे यांचा जन्म झाला आहे. गावातील गटारी, रस्ते कामे करायची आहेत. लोकांची पडलेली घरे बांधून द्यायची आहेत, गल्लीतील माणसे आपल्याच पाठीमागे असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

कोल्हापूर

राज्यात जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मोठ्या इर्षेन उमेदवारी अर्ज भरले जात आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात देखील हीच ईर्ष्या पाहायला मिळाली. एकीकडे प्रत्येक उमेदवार मोठा गाजावाजा करत अर्ज दाखल करण्यासाठी येत होते, त्याच वेळी कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज शहरातील श्रेष्टी विद्यालयावर अर्ज करण्यासाठी गीजवणे गावची 75 वर्षीय हौशाबाई कांबळे पोहचली. गिजवणे गावातील हौशाबाई कांबळे या देवदाशी असून गृहिणी आहेत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आणि नातवंडे आहेत. स्वत: यल्लामा देवीची भक्त आणि देवदाशी असल्याने त्या गावात जोगवा मागतात. या निमित्ताने त्याचा गावात चांगला जनसंपर्क आहे. त्याचाच विचार करून त्यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.

आजीची ऊर्जा तरुण पिढीला प्रेरणादायी

मुलाने निवडणूक लढविण्यासाठी सहमती दर्शविल्यानंतर त्या थेट उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लगबगीने पोहचल्या. यावेळी त्यांनी लोकांची कामे करायला निवडून यायचे असल्याची इच्छा बोलून दाखवली. हौशाबाई कांबळे यांनी या वयातही आपण नक्की निवडून येणार आणि गावची विकासाची कामे करणार असल्याचे सांगितले. यावरून 75 वर्षीय हौशाबाई आजींची या वयात निवडून येण्याची दाखवलेली सक्रियता आणि आजीची ऊर्जा तरुण पिढीला प्रेरणादायी आहे.

Last Updated : Jan 1, 2021, 10:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.