ETV Bharat / state

जिल्हा परिषद अध्यक्षांची बदनापूर पंचायत समितीला अचानक भेट - बदनापूरच्या घडामोडी

बदनापूर पंचायत समितीचा कारभार सध्या वादाच्या भोवऱ्यात असून येथील अधिकारी- कर्मचारी कामात कुचराई करून वेळेवर न येणे, परस्पर सुटी घेणे, दौऱ्यावर असल्याचे सांगून कार्यालयात उपस्थित नसणे आदींमुळे कार्यालयीन कामकाजात दिरंगाईच्या तक्रारी नेहमी येत होत्या.

बदनापूर जालना
बदनापूर जालना
author img

By

Published : Jul 29, 2020, 9:01 PM IST

बदनापूर (जालना) - जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी बदनापूर येथील पंचायत समिती कार्यालयात अचानक भेट दिली. त्यावेळी अनेक कर्मचारी दिसून न आल्यामुळे अध्यक्षांनी गट विकास अधिकाऱ्यांना विचारणा करून संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले.

यावेळी त्यांनी आढावा बैठक घेतली असता अनेक विभागप्रमुखांना आपल्या विभागाची माहिती न देता आल्यामुळे अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली.

बदनापूर पंचायत समितीचा कारभार सध्या वादाच्या भोवऱ्यात असून येथील अधिकारी- कर्मचारी कामात कुचराई करून वेळेवर न येणे, परस्पर सुटी घेणे, दौऱ्यावर असल्याचे सांगून कार्यालयात उपस्थित नसणे आदींमुळे कार्यालयीन कामकाजात दिरंगाईच्या तक्रारी नेहमी येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर व कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव होऊ नये, म्हणून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत आढावा घेण्यासाठी जालना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे व शिवसेना तालुकाप्रमुख तथा रोषणगाव जिल्हा परिषद गटाचे सदस्य जयप्रकाश चव्हाण यांनी अचानक पंचायत समिती कार्यालयास भेट देऊन येथील सभागृहात आढावा बैठक घेतली.

या बैठकीलाच अनेक कर्मचारी-अधिकारी अनुपस्थित दिसून येत असल्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तम वानखेडे यांनी नाराजी व्यक्त करत जे अधिकारी-कर्मचारी अनुपस्थित असतील त्यांच्यावर थेट कारवाई करण्याचे आदेश गट विकास अधिकारी विठ्ठल हरकळ यांना दिले.

यावेळी अध्यक्षांनी विविध विभागांचाही आढावा घेतला असता अनेक विभागाच्या अधिकाऱ्यांना आपल्या विभागाचा अहवालही व्यवस्थित मांडता न आल्यामुळे वानखेडे यांनी सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी अधिकारी- कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती कमी असल्याचे गटविकास अधिकारी यांनीही यापुढे सर्वांनी शासकीय नियमानुसार कार्यालयीन वेळेत येऊन कार्य करण्याचे आवाहन उपस्थित कर्मचाऱ्यांना केले.

जिल्हा परिषद अध्यक्ष वानखेडे व शिवसेना तालुकाप्रमुख जयप्रकाश चव्हाण यांनी यावेळी प्रत्येक विभागाकडून त्यांनी कोरोना काळात व आधी केलेल्या कामाचा आढावा घेऊन सध्याच्या कोरोना काळातही सर्वांनी ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्याचे आवाहन केले. जिल्हा परिषद अध्यक्षांनी अचानक भेट देऊन पाहणी केल्यामुळे अनुपस्थित कर्मचाऱ्यांमध्ये मात्र खळबळ उडाली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.