जालना: राजूर येथील चिकनगाव रोडवरील प्लॉटिंगवर आज रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास प्लॉटिंग व्यावसायिक गोरक्षनाथ कुमकर (वय ५२) यांचा निर्घृण खून करण्यात आला आहे. खून करून आरोपी पसार झाले असून घटनास्थळी रक्ताने माखलेली एक कुऱ्हाड आढळून आल्याचे समजते.
व्यावसायिक कारणातून खून: हसनाबाद पोलीस ठाण्याचे सपोनि. वैशाली पवार यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलविला आहे. खूनाचे कारण अद्याप अधिकृतरित्या स्पष्ट झाले नाही. तरी देखील हा खून प्लॉटिंगच्या व्यवहारातूनच झाल्याची परिसरात चर्चा आहे.
जीम ट्रेनरची हत्या: नवी दिल्ली दिल्लीतील प्रीत विहार परिसरात जिम व्यावसाईक महेंद्र अग्रवाल यांचा गोळ्या झाडून खून केल्यामुळे राजधानीत खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. जिम व्यावसायिकाचा खून त्याच्या माजी ट्रेनरनेच केला असून यात एका राष्ट्रीय ज्युडो खेळाडूचाही सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले. रवी कुमार तोमर आणि इंद्रवर्धन शर्मा या दोन आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तर त्यांचा तिसरा साथिदार विजय अद्याप फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यातील इंद्रवर्धन शर्मा हा राष्ट्रीय ज्युडोचा खेळाडू असल्याचेही पोलिसांनी यावेळी सांगितले.
जिम मालकाने लावला होता अपहरणाचा आरोप: माजी जिम ट्रेनर इंद्रवर्धन याच्यावर 2017 मध्ये जिम मालकाने अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे इंद्रवर्धनला तुरुंगाची हवा खावी लागली होती. त्याचा बदला घेण्यासाठी त्याने आपल्या साथिदारांसह हा खून केल्याचा खुलासा त्याने पोलिसांकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलीस दोन्ही आरोपींची कसून चौकशी करत आहेत.
बांधकाम व्यावसायिकाला बेदम मारहाण करून खून: पुण्यातील क्रिकेट बेटिंगमध्ये हरलेले पैसे परत दिले नाही, म्हणून बेटिंग घेणाऱ्यांनी 32 वर्षांच्या बांधकाम व्यावसायिकाला बेदम मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यामध्ये घडली होती. उधारी वसूल करण्यासाठी आरोपींनी 16 नोव्हेंबरला संकेत रामचंद्र अंनबुले याचं एका चारचाकी गाडीमध्ये अपहरण केले. अपहरण केल्यानंतर आरोपींनी के के मार्केट जवळील एका गाड्यांमध्ये संकेत रामचंद्र अंनबुले याला बेदम मारहाण केली.
हेही वाचा: Lizard : रंगीला सरडा पाहिलाय का? मध्य महाराष्ट्रात आढळला दुर्मिळ सरडा