जालना - राज्यातल्या सर्वच जिल्ह्यांत सर्वदूर पाऊस पडतोय. जालन्याच्या परतूर तालुक्यातील बाम्हणी -वालखेट गावाजवळील पुलावर तीन जण पाण्यात बुडाल्याची घटना घडली. दोन जणांना वाचवण्यात यश आले असून एक जण बेपत्ता आहे.
घटनास्थळी तहसीलदार रूपा चित्रक यांनी धाव घेतली असून परिस्थितीची पाहणी केली. राजेंद्र खालापुरे (35), आसाराम खालापुरे (55) आणि लखन कांबळे (32 ) हे रात्री परतूरहून बाम्हणी गावाकडे जात असताना ही घटना घडली. आसाराम खालापुरे बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.
दिवसभर संततधार पावसामुळे बाम्हणी गावाजवळील पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ता बंद झाला. रात्री पुलावरून पाणी वाहत असल्याने तिघांनी एक मेकाला धरून पूल ओलांडण्याचा निर्णय घेतला. आसाराम खालापुरे यांचा पाण्यात जाताच पाय घसरला. तीन जण पाण्यात पडले आणि पाण्यात वाहून गेले. दोन जणांना वाचवण्यात गावकऱ्यांना यश आले.
हेही वाचा - अकोला जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे पाच जणांचा मृत्यू, अद्यापही शोधमोहीम सुरू