ETV Bharat / state

'तो' रुग्ण कोरोनाबाधित नव्हे; जालना आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण - jalna district health department

जालना जिल्ह्यात 12 मार्चला सकाळी 9 वाचेच्या सुमारास एक मेसेज व्हायरल झाला होता. यात कोरोनाचा एक संशयित पोलीस खात्यातील तरूण (रा. खरपुडी, ता. जालना) सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास औरंगाबाद येथील सामान्य रूग्णालयात दाखल झाला आहे. ही अफवा पसरल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, 'तो' मेसेज खोटा असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

जालना आरोग्य विभाग
जालना आरोग्य विभाग
author img

By

Published : Mar 14, 2020, 1:37 PM IST

Updated : Mar 14, 2020, 1:56 PM IST

जालना - 12 मार्चला व्हायरल झालेला 'तो' मेसेज खोटा असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच कोरोना बद्दल घाबरून न जाण्याचे आवाहनही आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

'तो' रुग्ण कोरोनाबाधित नव्हे; जालना आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण

काय आहे प्रकार?

जालना जिल्ह्यात 12 मार्चला सकाळी 9 वाचेच्या सुमारास एक मेसेज व्हायरल झाला होता. यात कोरोनाचा एक संशयित पोलीस खात्यातील तरूण (रा. खरपुडी, ता. जालना) सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास औरंगाबाद येथील सामान्य रूग्णालयात दाखल झाला आहे. ही अफवा पसरल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

यानंतर शुक्रवारी 13 मार्चला रात्री 10 वाजेच्या सुमारास या संशयित रुग्णाचे सर्व अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले. यानंतर आरोग्य विभागाने सुटकेचा नि:श्वास सोडला. आज (शनिवारी) सकाळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी सामान्य रुग्णालयात विशेष कक्षामध्ये भरती केलेल्या या रुग्णाची त्यांच्या पथकासह भेट घेऊन तपासणी केली. तसेच सदरील रुग्ण हा ठणठणीत आणि कुठलाही आजार झालेला नसल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - 'कोरोना'ची धास्ती! येरावडा कारागृहातील कैद्यांसाठी तुरुंग प्रशासनाकडून मास्कसह सॅनिटायझर

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून या संशयित रुग्णांची काळजी घेणाऱ्या परिचारिका मात्र कसल्याही भीतीच्या वातावरणात खाली किंवा ताणतणावाखाली दिसल्या नाहीत. उलट त्यांनी त्यांचे कर्तव्य पार पाडल्याचा आपल्याला आनंद असल्याचे अभिप्राय दिले आहेत. त्यांची हिंमत पाहून या पोलीस कर्मचाऱ्याला प्रोत्साहन मिळाले. तर कोरोनाचा संशयित आहे, हा न्यूनगंड न बाळगता जनतेसमोर जाऊन आपबिती सांगण्याची आणि जनतेला आवाहन करण्याची देखील त्याची इच्छा झाली.

Last Updated : Mar 14, 2020, 1:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.