ETV Bharat / state

जालन्यात भिंत फोडून तिजोरी पळवणारी टोळी गजाआड, १४ लाखांचा मुद्देमाल जप्त - watur fata robbery

आरोपींकडून गुन्ह्यामध्ये चोरीला गेलेली रोख रक्कम ३ लाख ७१ हजार ८००, कॅमेरा, मोबाईल, कपडे किंमत ८३ हजार, हे साहित्य, तसेच टाटा सुमो, जीप, स्विफ्ट कार, दोन दुचाकी असा एकूण १४ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तिजोरी पळवणारी टोळी गजाआड
तिजोरी पळवणारी टोळी गजाआड
author img

By

Published : Oct 26, 2020, 10:32 PM IST

जालना- भिंत फोडून तिजोरी पळवणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले आहे. त्यांच्याकडून कॅमेरे, मोबाईल असा सुमारे १४ लाख ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

माहिती देताना जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विनायक देशमुख

परतूर तालुक्यातील वाटूर फाटा येथे असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये २२ ऑक्टोबरला चोरी झाली होती. चोरट्यांनी बँकेच्या मागच्या बाजूला असलेली भिंत तोडून बँकेत प्रवेश केला होता व बँकेमधील, इन्व्हर्टर, बॅटरी, डी.व्ही.आर या साहित्यासह रोख रक्कम ठेवलेली तिजोरी पळवून नेली होती. याप्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेला हा गुन्हा जुना जालना भागातील शनी मंदिर चौकातील आनंदी स्वामी गल्लीत राहणाऱ्या सागर उर्फ पिराजी दिगंबर डुकरे (वय २३) यांने केल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. त्यावरून गुन्हे शाखेच्या पथकाने डुकरे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने कृष्णा भगवान गजमल (वय २७, रा.सेलू ता. डासाळा) सुनील शालिक झिने (वय २१, रा. इंदिरानगर, हनुमान मंदिर जवळ) विनोद उर्फ लाल्या गजानन तांबेकर (वय २३, रा. मंमादेवी नगर राम मंदिर जवळ) अभिषेक अनंतराव कुलकर्णी (वय २०, रा. आनंदी स्वामी गल्ली, जुना जालना) आनंद हरिभाऊ वानखेडे (वय २०, रा. इंदिरा नगर) या पाच जणांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली.

या आरोपींकडून गुन्ह्यामध्ये चोरीला गेलेली रोख रक्कम ३ लाख ७१ हजार ८००, कॅमेरा, मोबाईल, कपडे किंमत ८३ हजार, हे साहित्य, तसेच टाटा सुमो, जीप, स्विफ्ट कार, दोन दुचाकी असा एकूण १४ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या जप्त केलेल्या साहित्याची पोलीस अधीक्षक विनायक देशमुख आणि अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी पाहणी केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सिंह गौर यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत, प्रशांत देशमुख, गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे आदींनी ही कारवाई केली.

इलेक्ट्रिक मशीनने तिजोरी उघडली

तिजोरी तर पळवली, मात्र ती उघडत नव्हती, त्यामुळे चोरट्यांनी लोखंड कापण्याच्या इलेक्ट्रिक मशीनद्वारे तिजोरीचा मागचा भाग कापला आणि रोख रक्कम काढून घेतली. रक्कमेची वाटणी केल्यानंतर एका आरोपीने रक्कमेमधून नवीन कॅमेरा घेतला, दुसऱ्या आरोपीने महागडा मोबाईल घेतला, तर तिसऱ्या आरोपीने कपडे खरेदी केले. या सर्व वस्तू पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या सर्व वस्तू आरोपींनी त्यांचे काम झाल्यानंतर नदीपात्रात टाकल्या होत्या, त्या पोलिसांनी काढून आणल्या आहेत.

हेही वाचा- जालना बाजार समितीत कापूस खरेदीला सुरुवात, सहा हजारांचा भाव

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.