ETV Bharat / state

निवडणुकीच्या कामास टाळाटाळ, 6 कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल - jalna election commission news

निवडणुकीच्या कामात टाळाटाळ करणाऱ्या सहा कर्मचाऱ्यांवर तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी कारवाई केली आहे. नायब तहसीलदार दिलीप सोनवणे यांच्या तक्रारीनुसार या अधिकाऱ्यांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

six government officers restigated in jalna
निवडणुकीच्या कामात टाळाटाळ करणाऱ्या सहा कर्मचाऱ्यांवर तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी कारवाई केली आहे.
author img

By

Published : Feb 6, 2020, 3:01 PM IST

जालना - निवडणूक आयोगाने सुचवल्यानुसार सध्या मतदार पडताळणी कार्यक्रम सुरू आहे. त्यानुसार 13 फेब्रुवारी 2020 पर्यंत हे काम पूर्ण करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या आहेत. यासाठी तहसील स्तरावर पर्यवेक्षक व मतदान केंद्रस्तरावर अधिकाऱ्यांना सर्व जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या आहेत. मात्र, कामात टाळाटाळ करणाऱ्या सहा कर्मचाऱ्यांवर तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी कारवाई केली आहे. नायब तहसीलदार दिलीप सोनवणे यांच्या तक्रारीवरून या अधिकाऱ्यांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

six government officers restigated in jalna
निवडणुकीच्या कामात टाळाटाळ करणाऱ्या सहा कर्मचाऱ्यांवर तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी कारवाई केली आहे.

मुख्य निवडणूक आयोगाने मतदार पडताळणी कार्यक्रमासंदर्भात 18 नोव्हेंबरला पत्र पाठवून मतदार पडताळणी कार्यक्रम राबवण्याचे सुचवले आहे. त्यानुसार मतदार यादी भागातील प्रत्येक मतदाराची त्याच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेट घेणे आणि संबंधित मतदारांचा तपशील पडताळणी करण्याचे आयोगाचे निर्देश आहेत. तसेच संबंधित काम 13 फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करण्याच्या सुचना देखील देण्यात आल्या आहेत. तरीही सहा कर्मचाऱ्यांनी आत्तापर्यंत कोणतेही काम न केल्याने या कर्मचाऱ्यांवर लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950 कायद्यातील कलम 32 नुसार गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. तसेच यामुळे हे अधिकारी शिक्षेस पात्र ठरत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, जिल्ह्यात 397 कर्मचारी निवडणूक विभागाचे काम करत आहेत. यामध्ये जालना मतदारसंघात 304, परतूर तालुक्यात 34 आणि घनसावंगी तालुक्यात 59 कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांवर मध्यरात्री गुन्हे दाखल झाल्यामुळे आज सकाळपासूनच तहसील कार्यालयात उर्वरित कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या कामाचे अहवाल देण्यास सुरुवात केली आहे.

गुन्हा नोंदवण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे

संजय तिवारी नगर परिषद जालना; नेमून दिलेला भाग क्रमांक 51 मुर्गी तलाव
शिवाजी भोसले, नगरपरिषद जालना; नेमून दिलेला भाग क्रमांक 84 बैदपुरा
रवींद्र खिल्लारे, नगरपरिषद जालना; भाग क्रमांक 165 शास्त्री मोहल्ला
एस के केदारे ,जिल्हा परिषद जालना; चाती गल्ली, सदर बाजार
व्ही पी पवार ,सरस्वती भुवन विद्यालय जालना; भाग भोईपुरा
यु वी टाकसाळे ,सरस्वती भुवन विद्यालय; भाग भोईपुरा

Intro:निवडणूक आयोगाने सुचविल्या नुसार सध्या जालना तालुक्यामध्ये मतदार पडताळणी कार्यक्रम 2019 सुरू आहे. त्यानुसार दिनांक 13 फेब्रुवारी 2020 पर्यंत हे काम पूर्ण करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिलेल्या आहेत. तहसील स्तरावर पर्यवेक्षक व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना आपापल्या जबाबदाऱ्या वाटून देण्यात आले आहेत .मात्र दिलेली जबाबदारी टाळणाऱ्या सहा कर्मचाऱ्यांवर तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी नियुक्त केलेल्या अधिकृत अधिकाऱ्याने म्हणजेच नायक तहसीलदार निवडणूक दिलीप सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सहा कर्मचाऱ्यांवर तालुका पोलीस ठाण्यात आज दिनांक 6 रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Body:पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की .मुख्य निवडणूक आयोगाने मतदार पडताळणी कार्यक्रम बाबतचे पत्र दिनांक 18 नोव्हेंबर रोजी पाठवून मतदार पडताळणी कार्यक्रम राबविण्याचे सुचविले आहे. त्यानुसार मतदार यादी भागातील प्रत्येक मतदाराची त्याच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेट घेऊन संबंधित मतदारांचा तपशील पडताळणी बाबत निर्देश दिलेले आहेत. आणि या संदर्भातील प्रशिक्षण दिनांक 4 डिसेंबर ते 1 जानेवारी 2020 दरम्यान संबंधितांना दिलेही आहे. आणि आणि हे सर्व काम 13 फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देशही ही निवडणूक आयोगाने दिलेले आहे. असे असतानाही खालील सहा कर्मचाऱ्यांनी आत्तापर्यंत कोणतेच काम केलेले नाही. त्यामुळे या कर्मचार्‍यांवर लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950 चे कलम 32 नुसार गुन्हा नोंदवून शिक्षेस पात्र ठरत आहेत .गुन्हा नोंद झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे पुढील प्रमाणे
1-संजय तिवारी नगर परिषद जालना ,नेमून दिलेला भाग क्रमांक 51 मुर्गी तलाव .
2शिवाजी भोसले, नगरपरिषद जालना ,नेमून दिलेला भाग क्रमांक 84 बैदपुरा .
3 रवींद्र खिल्लारे, नगरपरिषद जालना, भाग क्रमांक 165 शास्त्री मोहल्ला .
4 एस के केदारे ,जिल्हा परिषद जालना, चाती गल्ली, सदर बाजार .
5 व्ही पी पवार ,सरस्वती भुवन विद्यालय जालना ,भाग भोईपुरा.
6 यु वी टाकसाळे ,सरस्वती भुवन विद्यालय ,भाग भोईपुरा.
अशी या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
दरम्यान जालना जिल्ह्यात यात 397 कर्मचारी निवडणूक विभागाचे काम करत आहेत त्यामध्ये जालना मतदारसंघात 304 परतूर तालुक्यात 34 आणि घनसावंगी तालुक्यात 59 असे एकूण 397 कर्मचारी कार्यरत आहेत.
दरम्यान या कर्मचार्‍यांवर मध्यरात्री गुन्हे दाखल झाल्यामुळे आज सकाळपासूनच तहसील कार्यालयात उर्वरित कर्मचाऱ्यांनी आपण केलेल्या कामाचे अहवाल देण्यास सुरुवात केलेली आहे.

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.