ETV Bharat / state

Restrictions after omicron: केंद्र सरकार ठरवेल त्याप्रमाणे राज्यात निर्बंध लागू होतील - राजेश टोपे - आंतरराष्ट्रीय प्रवाशांची आरटीपीसीआर तपासणी

आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope ) म्हणाले, की महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यातच आता ओमायक्रॉनने शिरकाव केल्याने आता राज्यात बारकाईने लक्ष ठेवावे लागणार आहे. मुंबई विमानतळावर आतापर्यत 897 आंतरराष्ट्रीय प्रवाशांची आरटीपीसीआर करण्यात ( MH gov measures on omicron ) आली आहेत. आतापर्यत 3 जणांचे आरटीपीसीआर अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

राजेश टोपे
राजेश टोपे
author img

By

Published : Dec 2, 2021, 10:29 PM IST

Updated : Dec 2, 2021, 10:50 PM IST

जालना - कर्नाटकमध्ये ओमायक्रॉनचे 2 रुग्ण आढळून आल्यानंतर राज्यात ( MH gov measures on omicron ) उपाययोजना सुरू आहेत. सध्या केंद्र सरकार नवीन निर्बंध लादणार नाही. परिस्थितीनुसार केंद्र निर्णय घेणार असल्याची माहिती केंद्रातील अधिकाऱ्यांनी दिली असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. केंद्र ठरवेल ते निर्बंध राज्यात लावले जातील, असे आरोग्यमंत्र्यांनी ( Rajesth Tope on restrictions in threat of omicron ) माध्यमांशी बोलताना सांगितले.

आफ्रिकेतील ओमायक्रॉनबाबतची चर्चा आपल्याला ऐकायला मिळत होती. याच ओमायक्रॉनने अखेर भारतात शिरकाव केला आहे. महाराष्ट्राच्या शेजारीच असलेल्या कर्नाटकात ओमायक्रॉनचे 2 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने देशभरात खळबळ उडाली आहे.

ओमायक्रॉनने शिरकाव केल्याने राज्यात बारकाईने लक्ष ठेवावे लागणार

हेही वाचा-Booster Dose Need for Omicron : ओमायक्रॉनपासून बचाव करण्यासाठी 'बूस्टर डोस' आवश्यक: तज्ज्ञ

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, की महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यातच आता ओमायक्रॉनने शिरकाव केल्याने आता राज्यात बारकाईने लक्ष ठेवावे लागणार आहे. मुंबई विमानतळावर आतापर्यत 897 आंतरराष्ट्रीय प्रवाशांची आरटीपीसीआर करण्यात आली आहेत. आतापर्यत 3 जणांचे आरटीपीसीआर अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. हे नमुने जिनिमिक सिक्वेसिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यांचे अद्याप रिपोर्ट आले नाही. राज्यात दोन ठिकाणी ( Genomic sequencing to test omicron ) जिनोमिक सिक्वेसिंग लॅबचे काम सुरू आहे. एक मुंबईत आणि दुसरे पुण्यात सुरू आहे. जे तीन नमुने पॉझिटिव्ह आढळून आले, त्यांच्या संपर्कातील 28 जणांचे नमुने जिनोमिक सिक्वेसिंगसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचेही रिपोर्ट अजून आले नाही.

हेही वाचा-Vehicles entry in Kolhapur : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला टोपली; तपासणीविना कर्नाटकातून महाराष्ट्रात वाहने दाखल

राज्यात अजून एकही ओमायक्रॉनचा रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र, आपण सतर्क असून राज्यात जिनोमिक सिक्वेसिंग लॅब वाढवाव्या ( MH needs Genomic sequencing labs ) लागतील, असेही टोपे यांनी म्हटले आहे. राज्यात लसीकरणच आपल्याला ओमायक्रॉन पासून वाचवू शकेल. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन टोपे यांनी केले आहे. कर्नाटकमध्ये आढळलेल्या दोन ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रुग्णापैकी एका रुग्णांच्या संपर्कातील 6 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर या 6 जणांचे नमुने जिनोमिक सिक्वेसिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यांचे अजून रिपोर्ट आले नसल्याचे टोपे म्हणाले.

हेही वाचा-Omicron In India : भारतात ओमायक्रॉनचा शिरकाव, कर्नाटकमध्ये सापडले दोन रुग्ण

Last Updated : Dec 2, 2021, 10:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.