ETV Bharat / state

Children Covid Vaccination : जालन्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते मुलांच्या लसीकरणाला सुरुवात - लहान मुलांच्या लसीकरणावर राजेश टोपे

जालना जिल्ह्यात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत लहान मुलांच्या लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी राजेश टोपे यांनी 12 ते 15वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची मागणी (Corona Vaccine for Children ) केंद्राकडे केली.

राजेश टोपे
Rajesh Tope
author img

By

Published : Jan 3, 2022, 1:19 PM IST

जालना - जगभरात अनेक देशांमध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा धोका वाढत आहे. त्यामुळे आपल्याला अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या मुलांची, पालकांची चिंता कमी करण्यासाठी सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. देशातील 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचं (Children Covid Vaccination) आज म्हणजेच 3 जानेवारीपासून लसीकरण (Corona Vaccine for Children ) करण्यात येत आहे. आज जालना जिल्ह्यात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत लहान मुलांच्या लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी राजेश टोपे यांनी 12 ते 15वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची मागणी केंद्राकडे केली.

आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यात ओमायक्रॉन रुग्ण वाढले असले तरी लॉकडाऊनची परिभाषा प्रत्येक राज्यात वेगळी आहे. त्यामुळे लॉकडाऊनबाबत राज्यांना समान निकष असायला हवेत असंही टोपे म्हणाले. मुलांच्या लसीकरणाची मोहीम शाळेत राबवण्याची आमची ईच्छा होती. पण लसीकरणामुळे लहान मुलांना काही त्रास झाल्यास तात्काळ उपाय करणे गरजेचे आहे. त्यामुळे दवाखान्यात लसीकरण केलं, असंही टोपे यांनी स्पष्ट केलं.

राज्यात सर्वच राजकिय पक्षांच्या नेत्यांनी प्रत्येक कार्यक्रमात गर्दी टाळावी असंही टोपे यांनी म्हटलं. कोरोना वाढत असल्यानं प्रत्येकानं काळजी घेण्याचं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं.

केंद्र सरकारने वैद्यकीय सुविधेसाठी 23 हजार 123 कोटी रुपयेनिधी निधी राज्यांना दिला होता. त्यावर राज्यांनी फक्त 17 टक्के पेक्षा कोणत्याही राज्याने वापरला नाही, असा आरोप केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी केला होता. यावर बोलताना टोपे म्हणाले, की खर्च कसाही करून चालत नाही. त्याचं नियोजन करावं लागतं. हा निधी खर्च करण्यासाठी आढावा बैठक घेणार असल्याचे देखील टोपे म्हणाले. लॉकडाऊन बाबत सर्वच राज्यांना समान प्रोटोकॉल लागू करावा, अशी मागणीही केंद्राकडे केली असल्याचं त्यांनी सांगितले. शाळेमध्ये लसीकरण करण्यासाठी लवकर निर्णय घेऊ, असेही टोपे यांनी म्हटलं.

मोदींनी केली होती घोषणा -

गेल्या वर्षात 25 डिसेंबर 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ते 18 या वयोगटातील मुलांसाठी लसीकरणाची सुरुवात करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार आजपासून नोंदणीला सुरुवात झाली असून लसीकरणाची सुरुवात 3 जानेवारीपासून केली जाणार आहे. यासाठी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून कोविन पोर्टलवर (Cowin Portal) नोंदणीलाही सुरुवात करण्यात आली आहे. तसेच तसेच 10 डिसेंबरपासून आरोग्य कर्मचारी आणि 60 वर्षांवरील नागरिकांसाठी बूस्टर डोसही (Booster Dose) सुरु करण्यात येणार आहे.

हेही वाचा - CHILDREN VACCINATION - आजपासून राज्यात 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरूवात; पाहा कुठे काय परिस्थिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.