ETV Bharat / state

बदनापुरात राजेंद्र भोसल्यांनी शिवसेनेची साथ सोडून केला मनसेत प्रवेश - Badlapur Shiv Sena rebel

बदनापूर मतदारसंघात स्थानिक उमेदवाराला डावलून बाहेरील नेत्यांना पक्षाकडून उमेदवरी मिळत आहे. त्यामुळे मी शिवसेना सोडून मनसेमध्ये प्रवेश केला असल्याचे शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राजेंद्र भोसले यांनी सांगितले आहे.

राजेंद्र भोसले
author img

By

Published : Oct 6, 2019, 10:22 AM IST

जालना- बदनापूर मतदारसंघात स्थानिक उमेदवाराला डावलून बाहेरील नेत्यांना पक्षाकडून उमेदवरी मिळत आहे. त्यामुळे मी शिवसेना सोडून मनसेमध्ये प्रवेश केला आहे. येथून पुढे महाराष्ट्राला राज ठाकरे आणि मनसे शिवाय पर्याय नाही. आजची सरकार ही लोकांना खोटी आश्वासने देते. मात्र, काम कुठलेच होत नाही, असे शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राजेंद्र भोसले यांनी सांगितले आहे.

प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राजेंद्र भोसले

राजेंद्र भोसले यांनी काल शिवसेना सोडून मनसेमध्ये प्रवेश केला. त्याचबरोबर, त्यांनी काल बदनापूर विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला अर्ज सादर केला. त्यांच्यासोबत मनसेचे जिल्हाध्यक्ष गजानन गीते, बळीराम खटके आदींची उपस्थिती होती. बदनापूर विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघातील जनतेचे प्रश्न तातडीने सुटावेत म्हणून हा मतदारसंघ राखीव ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा- हो मी शिवसेनेचा बंडखोर - राजू अहिरे

बदनापुरात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे जालना येथील रहिवाशी बबलू चौधरी तर भाजप-सेना युतीकडून भाजपचे औरंगाबाद येथील विद्यमान आमदार नारायण कुचे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. स्थानिक उमेदवार डावलून बाहेरच्या उमेदवारांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे आपण बंडखोरी केली असल्याचे शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राजेंद्र भोसले यांनी सांगितले आहे. शिवसेनेच्या वतीने २००९ आणि २०१४ अशा दोन वेळेस मी उमेदवारी मागितली होती. मात्र उमेदवारी न मिळाल्यामुळे शिवसेनेसोबत बंडखोरी करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झेंड्याखाली आपण निवडणूक लढवीत आहोत. भविष्यात याच पक्षाचे सरकार असेल, असा विश्वस देखील राजेंद्र भोसलेंनी व्यक्त केला आहे.

Intro:शिवसेनेसोबत बंडखोरी करून मनसेकडून उमेदवारी; राखीव मतदारसंघात आयात उमेदवार कशासाठी - राजेंद्र भोसले यांचा प्रश्न
जालना
बदनापूर विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे या मतदारसंघातील जनतेचे प्रश्न तातडीने सुटावेत म्हणून हा मतदारसंघ राखीव ठेवण्यात आला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस कडून राष्ट्रवादी काँग्रेसचे जालना येथील रहिवाशी बबलू चौधरी तर भाजप-सेना युती कडून भाजपाचे औरंगाबाद येथे राहणारे विद्यमान आमदार नारायण कुचे यांना उमेदवारी देण्यात आली आहे .स्थानिक उमेदवार डावलून बाहेरच्या उमेदवारांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे आपण बंडखोरी केली आहे. शिवसेनेच्या वतीने 2009 आणि 2014 अशा दोन वेळेस उमेदवारी मागूनही न मिळाल्यामुळे शिवसेनेसोबत बंडखोरी करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झेंड्याखाली आपण निवडणूक लढवीत आहोत. भविष्यात याच पक्षाचे सरकार असेल असा विश्वस सेनेचा घरोबा तोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत कालच दाखल झालेले शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राजेंद्र भोसलेयांनी केला आहे .बदनापूर विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे त्यांनी आपला अर्जआज सादर केला .त्यांच्यासोबत मनसेचे जिल्हाध्यक्ष गजानन गीते, बळीराम खटके आदींची उपस्थिती होती.Body:सोबत visConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.