ETV Bharat / state

जालना रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवल्याची अफवा, औरंगाबादचा मद्यपी ताब्यात - जालना पोलीस बातमी

जालना रेल्वे स्थानकात बॉम्ब असल्याची माहिती औरंगाबाद येथील एका मद्यपी व्यक्तीने जालना पोलिसांना दिली. मात्र, रेल्वे स्थानकात बॉम्ब सापडलाच नाही. यामुळे अफवा पसरवणाऱ्या व्यक्तीला औरंगाबाद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Jalna Railway Station
जालना रेल्वे स्टेशन
author img

By

Published : Mar 10, 2021, 9:12 PM IST

Updated : Mar 10, 2021, 9:39 PM IST

जालना - औरंगाबाद येथील एका मद्यपीने आज (दि. 10 मार्च) दुपारी चार वाजेच्या सुमारास जालना पोलिसांना चांगलेच कामाला लावले. जालना रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवल्याचा फोन नियंत्रण कक्षाला केला. यामुळे धावपळ सुरू झाली. दरम्यान, पोलिसांनी त्या मद्यपीला ताब्यात घेतले आहे.

घटनास्थळ

औरंगाबादच्या बेवड्याने केला फोन

औरंगाबाद येथील गोंडा पवार नावाच्या मद्यपीने जालना पोलीस नियंत्रण कक्षात फोन करून जालना रेल्वे स्थानकात बॉम्ब असल्याचे सांगितले. त्यानंतर क्षणार्धात सर्व पोलीस यंत्रणा कामाला लागली. अवघ्या काही मिनिटांमध्येच जालना रेल्वे स्थानकाला बॉम्ब शोधक व नाशक पथकाने घेरले. सोबत श्वानपथक होतेच, मात्र त्याची स्थानकावर आवश्यकताच पडली नाही. बॉम्ब नाशक पथक पूर्ण रेल्वेस्थानकावर फिरून आले आणि शेवटी ही अफवा असल्याचा निष्कर्ष काढला. सुमारे अर्धा तास रेल्वेस्थानक पिंजून काढल्यानंतर काहीच हाती लागले नाही.

मद्यपी औरंगाबादचा

विश्वासनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद येथील गोंडा पवार नावाच्या मद्यपीने जालन्याच्या नियंत्रण कक्षात फोन केला होता. ही अफवा असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी या मद्यपी व्यक्तीचा शोध घेतला आणि हा फोन औरंगाबाद येथून आल्याचे कळाले. त्यानुसार औरंगाबाद पोलिसांशी संपर्क करून औरंगाबादच्या पोलिसांनी या मद्यपीला औरंगाबादमध्ये ताब्यात घेतले आहे. ज्यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले त्यावेळी तो नशेमध्ये धुंद होता.

हेही वाचा - भरारी पथकाला ठार मारण्याचा प्रयत्न; चार कर्मचारी बचावले

हेही वाचा - बेवारस वाहनांचा जालना पोलीस करणार लिलाव

Last Updated : Mar 10, 2021, 9:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.