ETV Bharat / state

आदर्श शिरसगावचा विकास झाला वेगात, मात्र अंगणवाडीला जागा मिळेना गावात - आदर्श गाव दत्तक योजना शिरसगाव बातमी

गावात अंगणवाडी आहे मात्र त्या अंगणवाडीत सुधारणा हवी अशी गावकर्‍यांची मागणी आहे. तर, अंगणवाडीत सुधारणा करण्यासाठी गावचे सरपंच तयार आहेत मात्र गावात अंगणवाडीला जागाच मिळत नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.

शिरसगाव
author img

By

Published : Sep 25, 2019, 11:26 AM IST

Updated : Sep 25, 2019, 3:15 PM IST

जालना - परतूर तालुक्यातील शिरसगाव हे जालना जिल्ह्याचे पालकमंत्री, तथा परतूरचे आमदार बबनराव लोणीकर यांनी आदर्श गाव दत्तक योजनेत दत्तक घेतलेले गाव. लहान आणि लोकसंख्या कमी असल्यामुळे गावचा विकास झालेला दिसत असला तरी गावात अंगणवाडीला जागा मिळत नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.

आदर्श शिरसगावात विकासकामांना अधोगती

परतुर शहरापासून १० किलोमीटरवर असलेले हे शिरसगाव हे पालकमंत्री लोणीकर यांनी दत्तक घेतले. या गावातील विकास कामात घराघरापर्यंत गट्टूचे रस्ते, बगीचे, इ लर्निंग शाळा आणि नवी मुंबई चारिटेबल ट्रस्टच्यावतीने कपडे धुण्यासाठी धोबीघाट तसेत वृक्षारोपण करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांना सर्व सोयी उपलब्ध झाल्या असून वृक्षारोपण केलेली झाडेही आता बऱ्यापैकी वाढली आहेत. मात्र, गावात नवीन अंगणवाडीच्या बांधकामासाठी जागाच मिळत नसल्याने गावकरी नाराज आहेत. गावात अंगणवाडी आहे मात्र त्या अंगणवाडीत सुधारणा हवी अशी गावकर्‍यांची मागणी आहे. तर, अंगणवाडीत सुधारणा करण्यासाठी गावचे सरपंच तयार आहेत मात्र गावात अंगणवाडीला जागाच मिळत नसल्याने गोंधळ वाढत चालला आहे.

हेही वाचा - परतूर पोलिसांनी 15 लाख 60 हजारांचा पकडला गुटखा

अवघ्या १५०० लोकवस्तीच्या या गावात पाचवी पर्यंत शाळा असून ३ शिक्षक कार्यरत आहेत. या शाळेची विद्यार्थी संख्या ८३ वर असून शाळेतील ३ शिक्षकांपैकी एक शिक्षक गैरहजर राहिल्यास दोन शिक्षकांवर पाच वर्ग सांभाळण्याची वेळ येत आहे. त्यामुळे निश्चितच शिक्षक जरी कायद्यानुसार पूर्ण असले तरी विद्यार्थ्यांचे मात्र शैक्षणिक नुकसान होत आहे. त्याचबरोबर गावात पानंद रस्ते, रिंग रोड, शाळकरी विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान इत्यादींची अपेक्षा गावकऱ्यांना आहे. याबरोबरच शाळेत घेतलेल्या बोरला भरपूर पाणी आहे. त्यामुळे तिथे सोलार यंत्रणा बसवून वीज पंपाद्वारे हे पाणी ग्रामपंचायत पर्यंत आणले गेले होते. तिथे हे वॉटर फिल्टर बसवून गावकऱ्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. मात्र सोलरचे पॅनल उडून गेल्यामुळे हे सोलर बंद पडले त्यामुळे गावकऱ्यांना हात पंपाने पाणी आणावे लागत आहे. पाण्याअभावी फिल्टर प्लांट आणि धोबीघाट हे दोन्ही बंद अवस्थेत आहेत. एकंदरीत गावात सर्वत्र विकास दिसत असला तरी पाण्याअभावी मात्र गावकर्‍यांचे आजही हाल आहेत.

हेही वाचा - जालन्यात घरफोड्या करणारी टोळी जेरबंद

गावात विकास कामांसाठी आलेला निधी -

ग्रामपंचायत कार्यालय - १२ लाख
शेततळे - १४ लाख,
सिमेंट बंधारे - १ कोटी
समाज मंदिर - ६ लाख
दलित वस्ती सिमेंट रस्ता - ५ लाख
घनकचरा नाली बांधकाम - १२ लाख
आमदार निधी नाली बांधकाम - ३ लाख
शाळा संरक्षण भिंत - ३ लाख
शाळा दुरुस्ती - ३ लाख
वॉटर फिल्टर - १० लाख
सौरपंप - ५ लाख

हेही वाचा - जालना: आदर्श ग्राम 'पारडगाव'चा डोईजड पाणीप्रश्न

याशिवाय नवी मुंबई चारीटेबल ट्रस्ट यांच्या वतीने गावामध्ये गट्टू बसून रस्ते तयार केले आहेत. सोबतच धोबीघाट आणि वृक्षारोपण केले आहे. तसेच मुलांना खेळण्यासाठी छोटासा बगीचाही केलेला आहे.

Intro:आमदार आदर्श दत्तकगाव योजनेतील ही स्टोरी आहे
vo वापरावा ही विनंती

परतूर तालुक्यातील शिरसगाव हे राज्याचे पाणीपुरवठा ,जालना जिल्ह्याचे पालकमंत्री, तथा परतूरचे आमदार बबनराव लोणीकर यांनी आदर्श गाव दत्तक योजनेत दत्तक घेतलेले गाव .लहान आणि लोकसंख्या कमी असल्यामुळे गावचा विकास झालेला दिसत असला तरी अंगणवाडीला गावात जागा मिळत नसल्यामुळे ग्रामस्थांची नाराजी आहे.

Body:परतुर शहरापासून दहा किलोमीटरवर असलेले हे शिरसगाव .या गावांमध्ये घराघरापर्यंत गट्टू चे रस्ते ,छोटासा बगीच्या ,इ लर्निंग शाळा ,आणि नवी मुंबई चारिटेबल ट्रस्टच्यावतीने कपडे धुण्यासाठी धोबीघाट आणि गावात वृक्षारोपण ही करण्यात आले आहे .त्यामुळे ग्रामस्थांना सर्व सोयी उपलब्ध झाल्या आहेत. वृक्षारोपण केलेले झाडेही आता बऱ्यापैकी वाढली आहेत .हे सर्व करत असताना शिक्षणाचा मूळ पाया जिथून घातल्या जातो ती अंगणवाडी कमजोर आहे. गावांमध्ये अंगणवाडी आहे मात्र ती पाहिजे तशी नाही ,अंगबवडीत सुधारणा हवी आहे. अशी मागणी गावकर्‍यांची आहे . सुधारणा ही करण्यासाठी गावचे सरपंच तयार आहेत मात्र गावात अंगणवाडी ला जागाच मिळेना .जुनी जिल्हा परिषद शाळा मोडकळीस आल्यामुळे कशीबशी गावाच्या बाहेर नवीन जागेत जिल्हा परिषदेची शाळा बांधली आहे. ग्रामपंचायत ही गावाच्या बाहेरच आहे. गावामध्ये सर्व जातीधर्माचे लोक राहतात. अवघ्या पंधराशे लोकवस्तीच्या गावात पाचवी पर्यंत शाळा असून तीन शिक्षक आहेत .कायद्याच्या चाकोरीत सापडलेली ही शाळा 83 विद्यार्थी असल्यामुळे शिक्षक वाढत नाहीत. पर्यायाने तीन शिक्षकांपैकी एक शिक्षक गैरहजर राहिल्यास दोन शिक्षकांवर पाच वर्ग सांभाळण्याची वेळ येत आहे. त्यामुळे निश्चितच शिक्षक जरी कायद्यानुसार पूर्ण असले तरी विद्यार्थ्यांचे मात्र शैक्षणिक नुकसान होत आहे .ग्रामीण भागातल्या गावाला शहरी भागाचा टच असला तरी गावकर्यांना याहीपेक्षा पुढे जाऊन ,पानंद रस्ते, रिंग रोड, गावात बगीच्या, शाळकरी विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान, अशा अनेक अपेक्षा आहेत.
शाळेत घेतलेल्या बोर ला भरपूर पाणी आहे. त्यामुळे तिथे सोलार यंत्रणा बसवून वीज पंपाद्वारे हे पाणी ग्रामपंचायत पर्यंत आणले गेले होते. आणि तिथे हे वॉटर फिल्टर बसून गावकऱ्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. मात्र सोलार चे पॅनल उडून गेल्यामुळे हे सोलर बंद पडले आणि आता हात पंपाने पाणी आणावे लागत आहे. पाण्याअभावी फिल्टर प्लांट आणि धोबीघाट हे दोन्ही बंद अवस्थेत आहेत. एकंदरीत गावांमध्ये हे सर्वत्र विकास दिसत असला तरी पाण्याअभावी मात्र ावकर्‍यांचे आजही हाल आहेत.
*विकास कामांसाठी आलेला निधी*
ग्रामपंचायत कार्यालय बारा लाख
शेततळे 14लाख,
सिमेंट बंधारे एक कोटी
समाज मंदिर सहा लाख
दलित वस्ती सिमेंट रस्ता 5लाख,
घनकचरा नाली बांधकाम बारा लाख
आमदार निधी नाली बांधकाम 3लाख
शाळा संरक्षण भिंत 3लाख
शाळा दुरुस्ती 3लाख
वॉटर फिल्टर 10लाख
सौर पंप पाच लाख
याशिवाय नवी मुंबई चारीटेबल ट्रस्ट यांच्या वतीने गावामध्ये गट्टू बसून रस्ते केले आहेत .सोबतच धोबीघाट आणि वृक्षारोपण केले आहे .त्यासोबत मुलांना खेळण्यासाठी छोटासा बगीचा ही केलेला आहे.

Conclusion:
Last Updated : Sep 25, 2019, 3:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.