ETV Bharat / state

जालन्यात अँटीजेन चाचणीला सुरुवात, एकूण नऊ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह - जालना अँटीजेन चाचणी

स्वॅब चाचणीसाठी नागरिकांना वाटणारी भीती आणि त्याचे अहवाल येण्यासाठी लागणारा विलंब या दोन्ही अडचणी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने आता रक्त तपासणीसाठी चाचणी केंद्र सुरू केले आहे. नगरपालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी 14 जुलैपासून ते सोमवार २० जुलैपर्यंत 154 रुग्णांची तपासणी करण्यात आली.

jalna antigen test  jalna corona update  jalgaon corona positive pateints  jalna corona positive cases  जालना पॉझिटिव्ह केसेस  जालना अँटीजेन चाचणी  जालना कोरोना अपडेट
जालन्यात अँटीजेन चाचणीला सुरुवात, एकूण नऊ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह
author img

By

Published : Jul 22, 2020, 3:34 PM IST

जालना - स्वॅब चाचणीनंतर आता जिल्हा प्रशासनाने शहरात विविध ठिकाणी अँटीजेन चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे रुग्णांना १५ मिनिटामध्ये त्यांचा अहवाल मिळणार आहे. सध्या जालन्यातील पाणीवेस भागात असलेल्या नगरपालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ही चाचणी सुरू आहे. या केंद्रावरील आतापर्यंत घेण्यात आलेल्या चाचणीमध्ये नऊ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारच्या चाचण्या शहरातील अन्य ठिकाणीदेखील घेण्याचे नियोजन सुरू आहे.

जालन्यात अँटीजेन चाचणीला सुरुवात, एकूण नऊ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह
स्वॅब चाचणीसाठी नागरिकांना वाटणारी भीती आणि त्याचे अहवाल येण्यासाठी लागणारा विलंब या दोन्ही अडचणी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने आता अँटीजेन चाचणी केंद्र सुरू केले आहेत. नगरपालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी 14 जुलैपासून ते सोमवार २० जुलैपर्यंत 154 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १७ रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहेत, तर 137 रुग्ण हे निगेटिव्ह आहेत. याची एकूण टक्केवारी नऊ टक्के आहे. डॉक्टर परवेज कुरेशी हे या केंद्रावर नोडल ऑफिसर म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या मदतीला प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील महिला कर्मचारी उपस्थित आहेत.

मागील आठवड्यातील चाचणी अहवाल -

वारचाचणीपॉझिटिव्ह
मंगळवार1501
बुधवार2606
गुरुवार 15 02
शुक्रवार 2002
शनिवार12 00
रविवार 1501
सोमवार 52 05

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.