जालना - जुन्या भांडणाच्या कारणावरून नवीन जालना भागातील काजीपुरा येथे दुसऱ्या पतीकडे राहणाऱ्या 30 वर्षीय महिलेचा पहिल्या पतीने खून केल्याची घटना रविवारी (दि. 9 ऑगस्ट) रात्री उशिरा घडली .
या प्रकरणी सदर बाजार पोलिसांनी 11 जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. दरम्यान, घटनास्थळाची उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खीरडकर व सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी पाहणी केली आहे.
या प्रकरणात तक्रारदार सय्यद माजीद सय्यद कयूम, वय 30 रिक्षा चालक यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पत्नी हिना ही कुटुंबियांसमेवर रात्रीचे जेवण केल्यानंतर झोपी गेली होती. रात्री साडेअकराच्या सुमारास हिनाच्या पहिल्या पतीने नातेवाईकांना सोबत घेऊन काजीपुरा येथील घरावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये लाकडाचे दार तोडून टाकले तसेच लोखंडी रॉड व चाकूद्वारे हिना तिच्यावर वार केले. तिला ठार केले. या हल्ल्यामध्ये घरातील अन्य काही सदस्य देखील जखमी झाले आहेत. सय्यद माजीद त्याच्या तक्रारीवरून सदर बाजार पोलिसांनी कलम 302 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी अरबाज खान जाफर खान (रा. वल्ली मामू दर्गा) याच्यासह निलोफर खा जाफरखान, नसीमाबी जाफर, हमीलाबी धूमअली शहा, नसीमाबी शेख वहाब, शहाबाज जाफरखान यांच्यासह एकूण अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांनी पहाणी करुन हे ठिकाण सील केले आहे घराच्या खिडक्यांच्या काचा आणि दरवाजाची तोडफोड झाली आहे.