ETV Bharat / state

विशेष विमानाने आज रात्री पोहोचणार सतीश पेहरेचे यांचे पार्थिव - jalna latest news

सुरेश पेहरे यांना तीन मुले आहेत. तीनही मुले भारतीय सैन्यदलात अभियंता म्हणून कर्तव्य पार पाडत आहेत. त्यातील सतीशचा अपघातात मृत्यू झाला.

satish-pehre-dead-body-will-reach-aurangabad-by-a-special-plane-tonight
लडाखमध्ये महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण
author img

By

Published : Jul 16, 2020, 2:58 PM IST

जालना - जाफराबाद तालुक्यातील वरुड बुद्रुक येथील सतीश पेहरे या अभियंत्याचा लडाख येथे मृत्यू झाला आहे. सतीश हा भारतीय सैन्यदलात अभियंता म्हणून कार्यरत होता. 14 रोजी लडाख येथे गलवान खोऱ्यात लोखंडी पुलाचे काम सुरू असताना, सतीशच्या डोक्याला उडून आलेला दगड लागला. यात त्याचा मृत्यू झाला.

लडाखमध्ये महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण

सुरेश पेहरे यांना तीन मुले आहेत. तीनही मुले भारतीय सैन्यदलात अभियंता म्हणून कर्तव्य पार पाडत आहेत. त्यातील सतीशचा अपघातात मृत्यू झाला. 14 जुलैला लडाख येथे गलवान खोऱ्यात लोखंडी पुलाचे काम सुरू असताना दगड उडून सतीश यांच्या डोक्यात लागला. यात त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, सतीशचे पार्थिव आज रात्री उशिरा विशेष विमानाने औरंगाबाद विमानतळावर येणार आहे. उद्या शुक्रवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हेही वाचा- लडाखमध्ये महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण; जालना जिल्ह्यावर शोककळा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.