ETV Bharat / state

"मला अटक झाली की कळेल मराठा समाज काय आहे", मनोज जरांगेंचा सरकारला गर्भित इशारा

Manoj Jarange Patil : मराठवाड्यात झालेल्या हिंसाचाराप्रकरणी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना अटक होण्याची शक्यता आहे. यावर जरांगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 2, 2023, 3:41 PM IST

जालना Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणावरून बीडमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. संतप्त आंदोलकांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घराला पेटवून दिलं होतं. आता या प्रकरणी सरकारनं कारवाई सुरू केली आहे. पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलं, तर अनेक जण रडारवर आहेत. या प्रकरणी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनाही अटक होण्याची शक्यता वर्तवली जातेय. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.

सरकारला गर्भित इशारा : "मराठा आंदोलकांवरील गुन्हे दोन दिवसांत मागे घेण्याचं सरकारनं म्हटलं होतं. मात्र तसं झालं नाही. त्यामुळे मला अटक होण्याची शक्यता आहे. मला अटक करणं सरकारसाठी एवढं सोपं नाही. अटक करायची असेल तर करू द्या, मी तयार आहे. मात्र मला एकदा अटक झाली की मराठा समाज काय आहे, हे सरकारला कळेल", अशा गर्भित इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे.

पोलीस आकसापोटी कारवाई करतायेत : मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, "आम्ही मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना आंदोलकांची अटक थांबवण्याची विनंती केली आहे. बीडमध्ये जे घडलं त्याचं आम्ही कधीही समर्थन केलं नाही. मात्र काही पोलीस केवळ आकसापोटी कारवाई करतायेत. पोलिसांना जात नसते आणि नसायलाही पाहिजे तेव्हाच राज्य शांत राहतं. पोलीस आपले मित्र आहेत. आपल्याला साथ देणारे आहेत अशी भावना निर्माण झाली पाहिजे, असं ते म्हणाले.

रॅली काढणं बंद करावं : १ डिसेंबरपासून मनोज जरांगेंच्या राज्यव्यापी दौऱ्याचा चौथा टप्पा सुरू झाला. त्यांच्या विदर्भ, मराठवाड्यात आणि खान्देशात सभा होणार आहेत. यावर बोलताना ते म्हणाले की, अनेक ठिकाणी माझ्या सभा होत आहेत. मात्र प्रत्येक सभेपूर्वी रॅली काढल्या जातायेत. यामुळे सभेला उशीर होतो. यामुळे आता रॅली काढणं बंद करावं, असं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा :

  1. मराठा आंदोलकांचा विरोध; अजित पवारांचा संभाजीनगर दौरा रद्द होण्यामागचं खरं कारण काय?
  2. मराठा आरक्षण आंदोलन; मनोज जरांगे यांच्या मागण्या सतत बदलत आहेत, मागासवर्गीय आयोगाची नाराजी
  3. मराठा आरक्षण : मनोज जरांगे यांचा फोटो छापलेल्या टी शर्टची वाढली मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.