जालना - जालन्यातील महिला आणि बाल रुग्णालयातुन ( Women and Child Hospital Jalna ) काल सकाळच्या सुमारास एका दिवसाच्या बाळाची चोरी झाली होती. ( Baby Stolen from Hospital Jalna ) चोरीला गेलेलं हे एक दिवसांचं बाळ शोधण्यात जालना पोलिसांना यश मिळालं आहे. बाळ पळवणारी अज्ञात महिलेलाही पोलिसांनी ताब्यात घेतले. कदीम जालना पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ( Kadim Jalna Police ) ही कारवाई केली.
पथक तयार करण्यात आले -
सोमवारी सकाळच्या सुमारास जालन्यातील महिला आणि बाल रुग्णालयातून एका अज्ञात बुरखाधारी महिलेनं बाळंतीण महिलेच्या नातवाईक असलेल्या महिलेची नजर चुकवून हे बाळ पळवलं होतं. आज सकाळी जालना पोलिसांनी या बाळाला परभणी जिल्ह्यातील सेलू येथून ताब्यात घेतलं. बाळ पळवणाऱ्या अज्ञात महिलेलाही जालना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू करत पोलीस पथकं स्थापन करून विविध ठिकाणी रवाना केले होते. हे बाळ मिळाल्यानंतर त्याच्या नातवाईकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
हेही वाचा - Malik Criticism of PM Modi : देशात कोरोना पसरण्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार -नवाब मलिक