ETV Bharat / state

मजबूत महाराष्ट्राला विरोधकांनी अस्थिर केले - जे. पी. नड्डा

बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार नारायण कुचे यांच्या प्रचारार्थ अंबड येथे ते नड्डा यांची सभा आयोजित केली होती. यावेळी त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.

जे .पी. नड्डा - संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Oct 12, 2019, 9:53 PM IST

Updated : Oct 13, 2019, 11:30 AM IST

जालना - महाराष्ट्र राज्य हे मजबूत राज्य आहे. या राज्यामध्ये केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशाला दिशा देण्याची ताकद आहे, असे असतानाही केवळ भ्रष्टाचाराने बरबटलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र अस्थिर ठेवला आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांनी आज (शनिवार) अंबड येथे केला.

प्रचार सभेत बोलताना खा. रावसाहेब दानवे आणि आ. नारायण कुचे

बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार नारायण कुचे यांच्या प्रचारार्थ अंबड येथे नड्डा यांची सभा आयोजित केली होती. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे, आमदार नारायण कुचे, माजी आमदार विलास खरात, अंबडच्या नगराध्यक्ष संगीता कुचे यांची उपस्थिती होती.

हेही वाचा - 'दोन्ही पैलवान तोलामोलाचे असल्याशिवाय कुस्तीत मजा येत नाही'

पुढे बोलताना नड्डा म्हणाले की, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर महाराष्ट्रामध्ये पाच वर्षाचा पूर्ण कार्यकाल करणारे देवेंद्र फडणवीस हे दुसरे मुख्यमंत्री आहेत. यापूर्वी काँग्रेसच्या कार्यकाळात एका मुख्यमंत्र्यांनी आपला कार्यकाल पूर्ण केला आहे .मात्र, त्यानंतर कोणी वर्षभर, कोणी दोन वर्ष ,कोणी सहा महिने, अशा पद्धतीनेच महाराष्ट्रावर राज्य केले आहे. या प्रकारामुळे महाराष्ट्र अस्थिर झाला आहे. मात्र, आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पाच वर्ष पूर्ण केले असून फक्त महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देण्याची ताकद मुंबईच्या नेतृत्वामध्ये आहे. आत्तापर्यंत कधी नव्हे एवढा विकास भाजपने केला आहे.

हेही वाचा - हा महाराष्ट्र मला तरुणांच्या हाती द्यायचाय - शरद पवार

विरोधी पक्षावर टीका करताना ते म्हणाले, की काँग्रेस पक्षाची मानसिकता दिवाळखोरीत निघाली आहे. ती आपल्याला ठीक करावी लागेल. या पक्षाचे नेते राहुल गांधी हे भारताच्या बाजूने आहेत की पाकिस्तानच्या हेच सध्या कळायला मार्ग नाही. भारतात राहून ते पाकिस्तानचे गुणगान गातात, याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुनियाच्या पटलावर भारताला नेऊन ठेवले आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

काँग्रेसमधील नेत्यांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळे आपल्याला त्यांच्याविषयी काही बोलायचे नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जेल आणि बेल या दोन्ही गोष्टीत गुरफटले आहेत. याचे कारण त्यांनी आत्तापर्यंत गरिबांचे पिलेले रक्त आहे, असेही ते म्हणाले. महाराष्ट्राच्या विकासाबद्दल बोलताना नड्डा म्हणाले, की पंधरा लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सध्या महाराष्ट्रात सुरू असून विकास गाथा लिहिल्या जात आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा उर्वरित विकास करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नारायण कुचे यांना निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी खासदार दानवे आणि उमेदवार आमदार नारायण कुचे यांचीही भाषणे झाली.

Intro:महाराष्ट्र राज्य हे मजबूत राज्य आहे या राज्यांमध्ये केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशाला दिशा देण्याची ताकद आहे ,असे असतानाही केवळ भ्रष्टाचाराने बरबटलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र अस्थिर ठेवला आहे. असा आरोप भारतीय जनता पार्टीचे कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांनी आज अंबड येथे केला.

Body:बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार नारायण कुचे यांच्या प्रचारार्थ अंबड येथे ते नड्डा यांची सभा आयोजित केली होती. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे ,माजी आमदार विलास खरात, आमदार नारायण कुचे ,अंबड च्या नगराध्यक्ष सौ .संगीता कुचे, आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना ते म्हणाले की स्वातंत्र्यप्राप्तीनंतर महाराष्ट्रामध्ये पाच वर्षाचा पूर्ण कार्यकाल करणारे देवेंद्र फडणवीस हे दुसरे मुख्यमंत्री आहेत .यापूर्वी काँग्रेसच्या कार्यकाळात एका मुख्यमंत्र्यांनी आपला कार्यकाल पूर्ण केला आहे .मात्र त्यानंतर कोणी वर्षभर, कोणी दोन वर्ष ,कोणी सहा महिने, अशा पद्धतीनेच महाराष्ट्रावर राज्य केले आहे. या प्रकारामुळे महाराष्ट्र अस्थिर झाला आहे ,मात्र आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पाच वर्ष पूर्ण केले असून फक्त महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देण्याची ताकद मुंबईच्या नेतृत्वामध्ये आहे .आत्तापर्यंत कधी नव्हे एवढा विकास भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलेला आहे. विरोधी पक्षावर टीका करताना ते म्हणाले की काँग्रेस पक्षाची मानसिकता दिवाळखोरीत निघाली आहे, ती आपल्याला ठीक करावी लागेल. या पार्टीचे नेते राहुल गांधी हे भारताच्या बाजूने आहेत की पाकिस्तानच्या हेच सध्या कळायला मार्ग नाही. भारतात राहून ते पाकिस्तानचे गुणगान गातात, याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुनियाच्या पटलावर भारताला नेऊन ठेवले आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
काँग्रेसमधील नेत्यांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळे आपल्याला त्यांच्याविषयी काही बोलायचे नाही, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जेल आणि बेल या दोन्ही गोष्टीच गुरफटले आहेत, याचे कारण त्यांनी आत्तापर्यंत गरिबांचे पिलेले रक्त आहे. असेही ते म्हणाले. महाराष्ट्राच्या विकासाबद्दल बोलताना नड्डा म्हणाले की, पंधरा लाख करोड रुपयांचे प्रकल्प सध्या महाराष्ट्रात सुरू असून विकास गाथा लिहिल्या जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा उर्वरित विकास करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नारायण कुचे यांना निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी खासदार दानवे आणि उमेदवार आमदार नारायण कुचे यांचीही समयोचित भाषणे झाली.

Conclusion:
Last Updated : Oct 13, 2019, 11:30 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.