ETV Bharat / state

जालन्यात ओला दुष्काळ जाहीर करावा; काँग्रेसचे धरणे आंदोलन - congress agitation

सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, तसेच जालना-औरंगाबाद महामार्गावर पडलेले खड्डे त्वरित बुजविण्यात यावेत. अशा मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेसच्यावतीने जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वात गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

जालन्यात ओला दुष्काळ जाहीर करावा; काँग्रेसचे धरणे आंदोलन
author img

By

Published : Nov 7, 2019, 6:57 PM IST

जालना - सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, तसेच जालना-औरंगाबाद महामार्गावर पडलेले खड्डे त्वरित बुजविण्यात यावेत. अशा मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेसच्यावतीने जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वात गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांना देण्यात आले.

जालन्यात ओला दुष्काळ जाहीर करावा; काँग्रेसचे धरणे आंदोलन

हेही वाचा - कर्जबाजारीपणा आणि मुलीच्या लग्नाची चिंता... जिल्ह्यात 24 तासात 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

शेतकऱ्यांसाठी भोकरदन तहसील कार्यालयासमोर लोकशाही पद्धतीने आंदोलन करणाऱ्या युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल देशमुख व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते ते मागे घेण्यात यावेत, सद्य परिस्थिती पाहता ओला दुष्काळ असलेल्या भागातील विद्यार्थ्यांची फी माफ करण्यात यावी, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी त्वरित करण्यात येऊन त्यांना लगेच मदत करावी, अशा मागण्या काँग्रसने केल्या आहेत.

अतिवृष्टी, आर्थिक मंदी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या याही समस्यांवर तातडीने उपाययोजना करून जनतेला दिलासा देण्यात यावा. अशी मागणीही त्यांनी केली आहे. आंदोलनामध्ये जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख, माजी आमदार धोंडीराम राठोड, कल्याण दळे, विजय जराड, काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख मेहमूद, विमल आगलावे, प्रतिभा सूर्यवंशी, शहाजहान शेख, प्रकाश नारायणकर, मेघराज चौधरी, विजय चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा - भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसचे तरुण आमदार सरसावले; सोनिया गांधींची आज घेणार भेट

Intro:सरकारने जालना जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, तसेच जालना-औरंगाबाद महामार्गावर पडलेले खड्डे त्वरित बुजविण्यात यावेत या आणि अन्य मागण्यांसाठी जालना जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने जालन्याचे आ. कैलास गोरंट्याल आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वात आज गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आणि मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांना देण्यात आले.

Body:वरील मागण्या प्रमाणेच शेतकऱ्यांसाठी भोकरदन तहसील समोर लोकशाही पद्धतीने आंदोलन करणाऱ्या जालना जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल देशमुख व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते ते मागे घेण्यात यावेत ,सद्य परिस्थिती पाहता ओला दुष्काळ असलेल्या भागातील विद्यार्थ्यांची फी माफ करण्यात यावी ,अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची पहाणी त्वरित करण्यात येऊन त्यांना लगेच मदत करावी, अतिवृष्टी ,आर्थिक मंदी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आदि समस्यांवर तातडीने उपाययोजना करून जनतेला दिलासा देण्यात यावा, या आणि अन्य मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले .या आंदोलनामध्ये जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, माजी आमदार धोंडीराम राठोड, कल्याण दळे, विजय जराड, काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख मेहमूद ,विमल आगलावे, प्रतिभा सूर्यवंशी ,शहाजहान शेख ,प्रकाश नारायणकर, मेघराज चौधरी, विजय चौधरी, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.