ETV Bharat / state

पोलिसांची भाजपच्या कार्यकर्त्याला अमानुष मारहाण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

जालन्यात पोलिसांनी तरुणाला केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पोलीस एका युवकाला बेदम मारहाण करताना दिसत आहेत.

पोलिसांची मारहाण
पोलिसांची मारहाण
author img

By

Published : May 27, 2021, 5:59 PM IST

Updated : May 28, 2021, 5:28 PM IST

जालना - जालन्यात पोलिसांनी तरुणाला केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पोलीस एका युवकाला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. नातेवाईकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यामुळे रुग्णालयाची तोडफोड करणाऱ्या युवकाला पोलिसांनी चोप दिल्याचा दावा केला जात आहे. हा तरुण भाजप कार्यकर्ता शिवराज नारियलवाला असल्याची माहिती आहे.

मारहाण करतानाचा व्हिडिओ

काय आहे प्रकरण?

9 एप्रिल रोजी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास दर्शन हिरालाल देवावाले या तरुणाला दीपक हॉस्पिटलमध्ये जखमी अवस्थेत भरती करण्यात आले होते. त्यावेळी जखमीची परिस्थिती पाहून डॉक्टरांनी काही शाश्वती दिली नाही. अशातच या तरुणाचा सात वाजून 45 मिनिटांनी मृत्यू झाला. त्यानंतर काही तरुणांनी या हॉस्पिटलमध्ये धुडगूस घालून हॉस्पिटलच्या काचा फोडल्या आणि अग्निशामक यंत्रणाही नादुरुस्त केली. अशा आशयाची तक्रार या हॉस्पिटलच्या सुरक्षारक्षकाने 10 एप्रिल रोजी कदीम जालना पोलीस ठाण्यात दिली आहे.

हेही वाचा - शरद पवार यांचा सरकारला पूर्ण आशीर्वाद - संजय राऊत

दरम्यान, 9 एप्रिल रोजी रात्री हॉस्पिटलमध्ये तोडफोड झाल्यानंतर कदीम जालना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन आणि पोलीस उपाधीक्षक सुधीर खिरडकर हे देखील त्या ठिकाणी हजर झाले. त्यावेळी तोडफोड करणारे काही कार्यकर्ते पळाले आणि काही कार्यकर्ते पोलिसांच्या तावडीत सापडले. त्यावेळी पोलिसांनी उपस्थित तरुणांना पांगवण्यासाठी चांगलेच झोडपून काढले होते. त्यामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले हे देखील सापडले होते. तब्बल दीड महिन्यानंतर त्यांना मारहाण झालेला व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओ संदर्भात पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन आणि सुधीर खिरडकर यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र गवळी समाजाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

हेही वाचा - जायकवाडी धरणाचा पाणीसाठा फक्त 37 टक्के

Last Updated : May 28, 2021, 5:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.