ETV Bharat / state

जालन्यात ३८ लाख रुपयांचा बेकायदेशीर गुटखा जप्त - जालना पोलीस

बेकायदेशीर गुटखा वाहून नेणारा कंटेनर शीघ्र कृती दलाच्या पोलिसांनी पकडला आहे. यातून ३७ लाख ८० हजार रुपयांच्या गुटख्यासह २५ लाख रुपयांचे कंटेनर असा एकूण ६२ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जालन्यात ३८ लाख रुपयांचा बेकायदेशीर गुटखा जप्त
author img

By

Published : Oct 18, 2019, 9:40 PM IST

जालना - बेकायदेशीर गुटखा वाहून नेणारा कंटेनर शीघ्र कृती दलाच्या पोलिसांनी पकडला आहे. यातून ३७ लाख ८० हजार रुपयांच्या गुटख्यासह २५ लाख रुपयांचे कंटेनर असा एकूण ६२ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चार दिवसापूर्वी हा कंटेनर दिल्लीहून बंगळुरुमार्गे मदुराईकडे निघाला होता. कंटेनर शुक्रवारी जालना पोलिसांनी ताब्यात घेतला.

जालन्यात ३८ लाख रुपयांचा बेकायदेशीर गुटखा जप्त

हेही वाचा - जामिनावर सुटून ३० घरफोडी करणारा 'मॉडेल' पोलिसांच्या जाळ्यात

कंटेनर (क्रमांक - आर जे १४ जीजे ८५५०) जालना जिल्ह्यातून जात असताना शीघ्र कृती दलाचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांना माहिती मिळाली. या कंटेनरमध्ये महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या तंबाखूजन्य पदार्थापासून तयार केलेला गुटखा वाहून नेला जात आहे. या माहितीवरून सदरील कंटेनर हा बीड रोडवर असलेल्या बारसवाडा फाट्याजवळील राजस्थान ढाब्याजवळ अडवला. गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी ही कामगिरी केली आहे. चालक अमीर खान माजिद खान (वय-३३) अमीर नगर ता. तीजारी जिल्हा अलवर (राजस्थान) येथील राहत आहे.

कंटेनरच्या चालकाने बेकायदेशीर गुटख्याबद्द्ल माहिती सांगण्यास नकार दिला. मात्र, कंटेनर मालकाचे नाव अब्दुल गणी उस्मान बिजपुर फरीदाबाद (हरियाणा) असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता कंटेनरमध्ये चपला बुटांच्या अन्य बॉक्समध्ये दडवलेला ३६ गोण्यांमध्ये रिमिक्स म्हणजेच सुटा गुटका आढळून आला. एका गोणी मध्ये ७० किलो गुटखा भरलेला होता.

पोलीस अधीक्षक चैतन्य यांच्यासह अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी याची पाहणी केली आहे. ही कारवाई शीघ्र कृती दलाचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांच्यासह, ज्ञानदेव नांगरे, नंदू खंदारे, किरण चव्हाण, अनिल काळे, आदींनी केली.

हेही वाचा - लॉजवर आढळला तरूणीचा मृतदेह, प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचा संशय

Intro:बंदी असलेला गुटका वाहून नेणारा कंटेनर शीघ्र कृती दलाच्या पोलिसांनी पकडला आणि या कंटेनरमधून 37 लाख 80 हजारांच्या गुटख्याच्या प्रेमिक्स सह 25 लाख रुपयांचे कंटेनर असा एकूण 62 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Body:चार दिवसापूर्वी दिल्लीहून बेंगलोर मार्गे मदुराई ला जाण्यासाठी निघाले कंटेनर क्रमांक क्रमांक आर जे 14 जीजे 85 50 हे आज जालना जिल्ह्यातून जात असताना शीघ्र कृती दलाचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांना माहिती मिळाली की, या कंटेनरमध्ये महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या तंबाखूजन्य पदार्थापासून तयार केलेला गुटका वाहून नेले जात आहे .या माहितीवरून सदरील कंटेनर हा बीड रोड वर असलेल्या बारसवाडा फाट्याजवळील राजस्थान ढाब्याजवळ गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी अडविला ,आणि चालक अमीर खान माजिद खान 33 ,अमीर नगर ता .तीजारी जिल्हा अलवार (राजस्थान) याच्याकडे अधिक माहिती विचारली असता त्याने कोणचा माल आहे हे माहीत नसल्याचे सांगितले ,मात्र कंटेनर चा मालक अब्दुल गणी उस्मान बिजपुर फरीदाबाद (हरियाणा) असल्याचे त्यांनी सांगितले, पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता कंटेनरमध्ये चपला बुटांच्या अन्य बॉक्स मध्ये दडवलेला 36 गोण्यांमध्ये रिमिक्स म्हणजेच सुटा गुटका आढळून आल्या. एका गोणी मध्ये 70 किलो गुटका भरलेला होता .या गुटख्याची बाजारामध्ये 37 लाख 80 हजार एवढी किंमत असून पोलिसांनी या गुटक्या सह पंचवीस लाख रुपयांचा कंटेनर असा एकूण 62 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे .
पोलीस अधीक्षक चैतन्य यांच्यासह अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी याची पाहणी केली आहे .ही कारवाई शीघ्र कृती दलाचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांच्यासह ,ज्ञानदेव नांगरे, नंदू खंदारे, किरण चव्हाण, अनिल काळे ,आदींनी केली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.