जालना - भोकरदन तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. काही भागात गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आधीच कोरोना व्हायरसमुळे राज्यात लॉकडाऊन आहे. त्यात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आस्मानी संकट उभे राहिले आहे.
काही शेतामध्ये गहू, ज्वारी, मका आदी पिके उभी आहेत. तर, काही ठिकाणी पिके सोंगनी करून ठेवली आहेत. वादळी वाऱ्यासह जोरदार गारांचा पाऊस झाल्यामुळे पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. दरम्यान, गारांच्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे शासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसान द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.