ETV Bharat / state

जालन्यात १० हजार रुपयांची लाच घेताना औरंगाबादच्या हेडकॉन्स्टेबलला अटक

तक्रारदाराने लाच-लुचपत प्रतिबंधक विभागामध्ये या हेडकॉन्स्टेबलविरोधात तक्रार नोंदवली. यानंतर २३ जुलैला अधिकाऱ्यांनी पाचोड येथे जाऊन चौकशी केली. त्यावेळी पोलीस कॉन्स्टेबल शेख हुसेन हे तक्रारदाराकडून दहा हजार रुपये लाच घेत असल्याचे निदर्शनास आले.

फाईल फोटो
author img

By

Published : Jul 24, 2019, 11:40 PM IST

जालना - वाळू वाहतूक करणारा हायवा सोडण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोड पोलीस ठाण्याच्या हेड कॉन्स्टेबलला दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. शेख गुल्फाम शेख हुसेन (वय 54 वर्ष) असे या हेडकॉन्स्टेबलचे नाव असून जालन्याच्या लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.

तक्रारदाराच्या मालकीचे हायवा टिप्पर आहे. त्याद्वारे शहागड ते औरंगाबाद या दरम्यान वाळू वाहतूक केली जाते. गेल्या 16 जुलैला शहागड येथून वाळू औरंगाबादकडे नेत असताना पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुरमा फाट्यावर पोलिसांनी तक्रारदाराचे वाहन अडवले. यासोबत अन्य तीन वाहनांवर कारवाई केली. यामध्ये तीन चालक आणि तीन मालक अशा सहा जणांवर वाळू चोरीचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यांमध्ये तक्रारदारांना अटक होऊन त्यांची जामिनावर सुटकाही झाली. मात्र, वाळूची वाहतूक करणारे हायवा वाहन पोलीस ठाण्यातच अडकले होते.

जामिनावर सुटून आल्यानंतर या हायवाच्या मालकांनी हेड कॉन्स्टेबल शेख गुल्फाम शेख हुसेन यांना हायवा सोडण्यासाठी विनंती केली. त्यावेळी शेख हुसेन यांनी न्यायालयात अर्ज केला. त्यामध्ये १० हजार रुपये दिल्यास तुमचा हायवा सोडण्यासाठी अहवाल सादर करणार असल्याचे हेड कॉन्स्टेबलने म्हटल्याचे नमूद करण्यात आले. तसेच, त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे त्यांनी जालन्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये तक्रार नोंदवली. यानंतर २३ जुलैला अधिकाऱ्यांनी पाचोड येथे जाऊन चौकशी केली. त्यावेळी पोलीस कॉन्स्टेबल शेख हुसेन हे तक्रारदाराकडून १० हजार रुपये लाच घेत असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी शेख हुसेन यांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे.

Intro:वाळू वाहतूक करणारा हायवा सोडण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोड पोलिस ठाण्याच्या हेड कॉन्स्टेबल ला जालन्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दहा हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले. शेख गुल्फाम शेख हुसेन वय 54 वर्ष असे या हेडकॉन्स्टेबल चे नाव आहे.

Body:तक्रारदाराच्या मालकीचे हायवा टिप्पर असून ते शहागड ते औरंगाबाद या दरम्यान वाळू वाहतूक करतात .दिनांक 16 जुलै रोजी शहागड येथून वाळू औरंगाबाद कडे नेत असताना पाचोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत मुरमा फाट्यावर पोलिसांनी तक्रारदाराचे वाहन अडवले, सोबत अन्य तीन वाहनांवर कारवाई केली. यामध्ये तीन चालक आणि तीन मालक अशा सहा जणांवर वाळू चोरीचा गुन्हा दाखल केला .सदरील गुन्ह्यांमध्ये तक्रारदारांना अटक होऊन त्यांची जामिनावर सुटकाही झाली. मात्र वाळूची वाहतूक करणारा हायवा पोलीस ठाण्यातच अडकले होते .
जामिनावर सुटून आल्यानंतर या हायवाच्या मालकांनी हेड कॉन्स्टेबल शेख गुलफाम शेख हुसेन यांना या हयवा सोडण्यासाठी विनंती केली. त्यावेळी शेख हुसेन यांनी कोर्टात अर्ज करून .मला दहा हजार रुपये द्या, तुमचा हायवा सोडण्यासाठी मी रिपोर्ट सादर करेल असे सांगितले. मात्र तक्रार दाराकडे पैसे नसल्यामुळे त्याने जालन्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागांमध्ये तक्रार नोंदविली .या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी दिनांक 23 रोजी या विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाचोडयेथे जाऊन खात्री केली. त्यावेळी पोलीस कॉन्स्टेबल शेख हुसेन हे तक्रार दाराकडून दहा हजार रुपये लाच घेत असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी शेख हुसेन यांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.