ETV Bharat / state

जालना जिल्ह्यात पहिल्या कोरोनाबाधित महिलेला 40 दिवसानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज

author img

By

Published : May 15, 2020, 11:16 PM IST

जालना शहरातील दुखी नगर येथील 65 वर्षीय महिला 6 एप्रिल रोजी कोरोनाची पहिली रुग्ण म्हणून निष्पन्न झाली होती. त्यानंतर जालनेकरांचे चांगलेच धाबे दणाणले होते. ही महिला 13 एप्रिलला कोरोना निगेटिव्ह आली.

jalna
जालना जिल्ह्यात पहिल्या कोरोनाबाधित महिलेला 40 दिवसानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज

जालना - शहरातील दुखी नगर येथील 65 वर्षीय महिला 6 एप्रिल रोजी कोरोनाची पहिली रुग्ण म्हणून निष्पन्न झाली होती. त्यानंतर जालनाकरांचे चांगलेच धाबे दणाणले होते. ही महिला 13 एप्रिलला कोरोना निगेटिव्ह आली. त्यामुळे जालनेकरांनी सुटकेचा नि: श्वास सोडला होता. मात्र, या आजारा सोबतच या महिलेला अन्य बरेच आजार असल्यामुळे सामान्य रुग्णालयातून सोडण्यात येत नव्हते. आज शुक्रवारी चाळीस दिवसांनंतर ज्या महिलेला घरी सोडण्यात आले आहे .सामान्य रुग्णालयातून टाळ्या वाजवून परिचारिका आणि आणि डॉक्टर मंडळींनी या महिलेला निरोप दिला आहे.

जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला नंतर या रुग्णाची पार्श्वभूमी तपासल्यानंतर ही महिला रांजणी येथील शिक्षिकेच्या संपर्कात आली होती. आणि या शिक्षिकेने गावातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे वाटप केले होते. त्यामुळे रांजणी गावात भीतीचे वातावरण होते सुमारे दीड हजार लोकांना क्वारंटाईन केले होते. या शिक्षिकेचाही स्वॅब घेण्यात आले होता. मात्र, सुदैवाने सर्व अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे आरोग्य प्रशासनाने या प्रकरणातून सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, आज या महिलेला घरी जाताना तिच्या भावना अनावर झाल्या आणि रडू कोसळले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.