ETV Bharat / state

दारूसाठी पैसे देत नसल्याच्या रागातून बापानेच केला मुलाचा खून

दारूसाठी पैसे देणे बंद केले. मी दारू पिऊन आल्यानंतर तो मलाच मारहाण करत होता. काही दिवसापूर्वी माझ्या जावयासमोर देखील संतोषने मला मारहाण केली. त्यामुळे हा राग माझ्या मनात सलत होता. यातूनच त्याचा काटा काढायचे ठरवले असल्याचे हनुमामने सांगितले.

author img

By

Published : May 16, 2019, 11:54 PM IST

संतोष कुरधने

जालना - मुलगा दारूसाठी पैसे देईना, मारहाण करून भांडणे करत असल्याच्या रागातून बापानेच मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना बदनापूर तालुक्यातील रामखेडा येथे घडली. संतोष कुरधने असे त्या खून झालेल्या २२ वर्षीय तरुणाचे नाव आहे. खूनाचीही घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ सुत्रे फिरवून आरोपी बापाला अटक केली आहे. हनुमान कुरधने असे त्या खुनी बापाचे नाव आहे.

जालना तालुक्यातील नंदापूर येथील मूळचे राहणारे हनुमान कुरधने हे काही वर्षांपूर्वी आपली उपजीविका भागवण्यासाठी रामखेडा येथे स्थायिक झाले होते. घटनेच्या दिवशी (बुधवारी १५) त्यांच्या शेजारचे कुटुंब बाहेरगावी गेले होते. त्यामुळे आरोपी हनुमान कुरधने हे पत्नी आणि मुलीसोबत शेजारच्या घरावर झोपायला गेले होते. मात्र, पहाटे त्यांची मुलगी जेव्हा घरात आली, त्यावेळी तिला संतोषचा खून झाल्याचे आढळून आले. त्यामुळे तिने आरडाओरडा करून आई-वडिलांना खाली बोलावले. त्यानंतर या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले.

या प्रकरणी खुनाची केस दाखल करून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला. मात्र, पोलिसांना या खुनाचे धागेदोरे सापडत नव्हते. त्यामुळे पोलीसदेखील चक्रावून गेले होते. दरम्यान पोलिसांनी तब्बल १६ साक्षीदारांची चौकशी केली. त्यातील एका साक्षीदारांच्या आणि हनुमान कुरधने याच्या बोलण्यातील तफावत लक्षात आली. त्यामुळे पोलिसांनी हनुमानला ताब्यात घेतले आणि विचारपूस करयला सुरुवात केली. त्यावेळी कुरधने हा वारंवार जवाब बदलत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन हकीकत विचारली असता, त्यानेच संतोषचा खून केला असल्याची कबुली दिली आहे.

हत्येचे कारण सांगताना कुरधने म्हणाला, "संतोष लहान असताना तो आजारी पडला त्याच्यावर मी खर्च केला, मोलमजुरी करून त्याला सांभाळले. त्यानंतर तो १२ वर्षांचा झाल्यानंतर स्वतः देखील मोलमजुरी करूनपैसे कमवू लागला. त्यानंतर काही दिवस त्याने घरखर्चासाठी पैसे देणे सुरू केले. मात्र, काही वर्षांपासून संतोषला दारू पिणे, पत्ते खेळण्याचे व्यसन लागले. तसेच तो घरी व मलाही दारूसाठी पैसे देणे बंद केले. मी दारू पिऊन आल्यानंतर तो मलाच मारहाण करत होता. काही दिवसापूर्वी माझ्या जावयासमोर देखील संतोषने मला मारहाण केली. त्यामुळे हा राग माझ्या मनात सलत होता. यातूनच त्याचा काटा काढायचे ठरवले असल्याचे हनुमाने सांगितले.

बुधवारी रात्री संतोष एकटाच घरात झोपला होता. हीच संधी पाहून आम्ही तिघे शेजारच्या घरच्या गच्चीवर झोपायला गेलो. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास मी दारू पिऊन आलो आणि संतोषचा खून केला. त्यानंतर मला काही माहीतच नाही, अशा पद्धतीने कुटुंबासोबत गच्चीवर जाऊन झोपलो. सकाळी मुलीने आरडाओरडा केल्यानंतर मला काही माहीत नसल्याचा बनाव केला. त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असल्याचे त्याने सांगितले.

याप्रकरणी या खुनाचा तपास लावण्यासाठी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य,अप्पर पोलीस अधिक्षक समाधान पवार, जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर,एडीएसचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोंदकर यांनी तातडीने चक्रे फिरवून लावला.

Intro:दारू पिण्यासाठी बापानेच केला 22 वर्षीय मुलाचा खून

जालना
बदनापूर तालुक्यातील रामखेडा येथे संतोष कुरधने या 22 वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली होती. घरात एकट्या झोपलेल्या संतोषच्या खुनाने पोलिसांना काहीच धागेदोरे सापडत नव्हते त्यामुळेच बदनापूर पोलिसांसह उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाची चक्रे गतीने फिरवली आणि आज दुपारी संतोष कुरधने याचा खून त्याचे वडील हनुमान कुरधने याने केल्याचे निष्पन्न झाले.

जालना तालुक्यातील नंदापुर येथील मूळचे राहणारे हनुमान कुरधने हे काही वर्षांपूर्वी आपली उपजीविका भागवण्यासाठी रामखेडा येथे स्थायिक झाले होते.त्यांच्या शेजारचे कुटुंब बाहेरगावी गेल्यामुळे हनुमान कुरधने हे त्यांची पत्नी आणि त्यांची मुलगी हे त्या शेजारच्या गचिवर झोपण्यासाठी गेले .पहाटे त्यांची मुलगी जेव्हा घरी आली त्यावेळी तिला संतोष चा खून झाल्याचे दिसले. त्यानंतर तिने आरडाओरडा करून आई-वडिलांना बोलावले.तसेच पोलिसांनाही माहिती मिळाली, त्यानंतर पोलिसांनी संतोषची उत्तरीय तपासणी करून प्रेत नातेवाईक कांच्या ताब्यात दिले .दरम्यानच्या काळात या कुणाचा कुठेही धागादोरा लागत नसल्यामुळे पोलीस देखील चक्रावून गेले होते. परंतु अधिकाऱ्यांनी या खुणा संदर्भात16 साक्षीदार तपासले.त्यातील एका साक्षीदारांच्या आणि हनुमान कुरधने याच्या बोलण्यातील तफावत लक्षात आली.त्यामुळे पोलिसांनी हनुमान ला ताब्यात घेतले आणि विचारपूस केली असता तो वारंवार जवाब बदलत असल्याचे लक्षात आले .त्यानंतर पोलिसांनी विश्वासात घेऊन हकीकत विचारली असता त्यानेच खून केल्याची कबुली दिली आहे. हनुमान कुरधने यांनी त्यांना सांगितले की, "संतोष लहान असताना तो आजारी पडला त्याच्यावर मी खर्च केला, मोलमजुरी करून त्याला सांभाळले. त्यानंतर तो 12 वर्षांचा झाल्यानंतर स्वतः देखील मोलमजुरी करूनपैसे कमवू लागला. त्यानंतर काही दिवस त्याने घरखर्चासाठी पैसे देणे सुरू केले. मात्र काही वर्षांपासून संतोषने दारू पिणे, पत्ते खेळणे ,प्रकार सुरू केले होते. त्याने मला पैसे देणे बंद केले .मी दारू पिऊन आल्यानंतर मलाच तो मारहाण करत होता. काही दिवसापूर्वी माझ्या जावयास समोर देखील संतोष ने मला मारहाण केली. त्यामुळे हा राग माझ्या मनात सलत होता. काल संतोष एकटाच झोपल्याचे संधी पाहून आम्ही तिघे शेजारच्या घरच्या गच्चीवर झोपायला गेलो, आणि मीच रात्री दारू पिऊन येऊन संतोष चा खून केला ,मला काही माहीतच नाही आशा पद्धतीने कुटुंबासोबत गच्चीवर जाऊन झोपलो, सकाळी मुलीने आरडाओरडा केल्यानंतर मला काही माहीत नसल्याचा बनाव केला .त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. संतोष चा खून मीच आहे."
असा कबुली जवाब संतोष च्या वडिलांनी हनुमान कुरधने यांनी दिला आहे. याप्रकरणी या खुनाचा तपास लावण्यासाठी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य,अप्पर पोलिस अधिक्षक समाधान पवार, जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर,एडीएसचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोंदकर यांनी तातडीने चक्रे फिरवून लावला.
Body:सोबत मयत संतोष कुरधने याचा फोटोConclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.