ETV Bharat / state

Attack Police By Sand Mafia In Jalana : वाळू माफियांचा पोलिसांवर हल्ला; सहा जणांना घेतले ताब्यात - Attack On Badnapur Police In jalana

बदनापूर तालुक्यातील डोंगरगाव जवळ अवैध वाळू माफियाकडून राजूर-फुलंब्री महामार्गावर पोलिसांवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या संतोष दानवे या वाळू माफियावर बदनापूर तहसीलदार यांनी गुन्हा दाखल केला. (Attack On jalana Police By Sand Mafia) मारुती स्विफ्ट कार, दोन महिला व चार जणांना दाब्यात घेतले असून सहाय्यक पोलिस निरीक्षक रामोडे यांच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाळूचा ट्रक
वाळूचा ट्रक
author img

By

Published : Mar 21, 2022, 8:53 AM IST

जालना - अवैध वाळू माफियाकडून बदनापूर तालुक्यातील डोंगरगाव जवळ राजूर-फुलंब्री महामार्गावर पोलिसांवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. (Attack On Badnapur Police In jalana) अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या संतोष दानवे या वाळू माफियावर बदनापूर तहसीलदार यांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर वाळूचा हायवा ट्रक ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी ट्रक अडवला. दरम्यान, पाच जणांनी पोलिसांवर अचानक हल्ला केल्याने सहायक पोलीस निरीक्षक रामोडे यांनी हवेत गोळीबार केला. दरम्यान, झालेल्या झटापटीत रामोडे गंभीर जखमी झाले आहेत.

सहायक पोलिस निरीक्षक रामोडे यांनी हवेत गोळीबार केला

पोलिसांनी डोंगरगाव शिवारात हायवा ट्रक अडवला असता, ट्रक चालकाने, पोलिसांनी आपला ट्रक अडवल्याची माहिती वाळू माफियांना दिली. मारुती स्विफ्ट कार मधून आलेल्या दोन महिला आणि चार ते पाच जणांनी पोलिसांवर अचानक हल्ला चढवल्याने आणि वाळूमाफियाच्या तावडीत सापडलेल्या पोलिसांना वाचवण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक रामोडे यांनी हवेत गोळीबार केला.

चार जणांना दाब्यात घेतले

या हल्ल्यात सहायक पोलिस निरीक्षक रामोडे हे गंभीर जखमी झाले असून घटनेची माहिती मिळताच बदनापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बनटेवाड यांनी घटनासाठी धाव घेऊन जखमी असलेल्या सहायक पोलिस निरीक्षक रामोडे यांना उपचरासाठी दाखल करत हायवा, मारुती स्विफ्ट कार, दोन महिला व चार जणांना दाब्यात घेतले असून सहाय्यक पोलिस निरीक्षक रामोडे यांच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - जळगावातील शिवभक्ताचे अनोखे प्रेम, घराला दिले गड - किल्ल्याचे स्वरूप.. पाहा व्हिडिओ

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.