जालना - जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघासाठी आलेल्या ईव्हीएम मशीनचे आज (मंगळवार) संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांंकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी सामाजिक न्याय सभागृहात ठेवलेल्या या ईव्हीएम मशीनची निवडणूक उपजिल्हाधिकारी दिपाली मोतीयाळे यांनी पाहणी केली.
हेही वाचा - पीएमसी बँक प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच असलेल्या सामाजिक न्याय सभागृहाच्या वरच्या मजल्यावर मागील महिन्यात आलेल्या ईव्हीएम मशीन सुरक्षित ठेवण्यात आल्या होत्या .चार खोल्यांमध्ये ठेवलेल्या मशीनवर पोलिसांचा कडक पहारा होता. तसेच या खोल्यांच्या खिडक्या बंद करून दार सील केले होते. हे सील सोमवारी विविध पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये तोडण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी दिपाली मोतियाळे, सांख्यिकी अधिकारी सयाजीराव, जालनाचे तहसीलदार श्रीकांत भुजबळ, नायब तहसीलदार निवडणूक दिलीप सोनवणे, गणेश पोलास, रामेश्वर झरेकर यांच्यासह पक्ष प्रतिनिधी दिपक रणनवरे, देविदास देशमुख आदींची उपस्थिती होती.
जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघासाठी 3 हजार 107 बॅलेट युनिट, 2 हजार 214 कंट्रोल युनिट, 2 हजार 284 व्हीव्हीपॅट मशीन असे साहित्य आले आहे .जालना जिल्ह्यामध्ये पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण 1 हजार 653 मतदान केंद्र आहेत. हे साहित्य आज सकाळी नऊ वाजल्यापासून संबंधित विधानसभा मतदार केंद्र वितरित केले जाणार आहे.