ETV Bharat / state

Rajesh Tope On Genome Sequencing : 800 RT-PCR पैकी 28 जणांचे पाॅझिटिव्ह नमुने जिनोमीक सिक्वेसिंगसाठी पाठवले - राजेश टोपे

ओमायक्रॉनबाबत राज्यात पूर्णपणे दखल घेतली जात असून मुंबई विमानतळावर आतपर्यंत 800 जणांची RTPCR चाचणी घेण्यात आली आहे. यापैकी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या 28 जणांचे नमुने जिनोमिक सिक्वेसिंगसाठी पाठवण्यात आल्याच आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Rajesh Tope On Genome Sequencing ) यांनी म्हटले आहे. अलीकडच्या एक महिन्यात बाहेरील देशातून आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

Rajesh Tope
राजेश टोपे
author img

By

Published : Dec 3, 2021, 4:52 PM IST

Updated : Dec 3, 2021, 6:25 PM IST

जालना - मुंबई विमानतळावर आतपर्यंत 800 जणांची RTPCR चाचणी करण्यात आली आहे. यापैकी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या 28 जणांचे नमुने जिनोमिक सिक्वेसिंगसाठी पाठवले आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Rajesh Tope On Genome Sequencing ) यांनी जालन्यात दिली आहे.

राजेश टोपे यांची प्रतिक्रिया

कर्नाटक सिमेवर सध्या निर्बंध नाही -

ओमायक्रॉनबाबत राज्यात पूर्णपणे दखल घेतली जात असून मुंबई विमानतळावर आतपर्यंत 800 जणांची RTPCR चाचणी घेण्यात आली आहे. यापैकी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या 28 जणांचे नमुने जिनोमिक सिक्वेसिंगसाठी पाठवण्यात आल्याच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. अलीकडच्या एक महिन्यात बाहेरील देशातून आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. कर्नाटक सिमेवर सध्या कोणतेही निर्बंध घातले जाणार नसून केंद्र घेईल त्या निर्णयाप्रमाणे राज्य निर्णय घेईल असे आवाहन त्यांनी केले आहे. याशिवाय नागरिकांनी काळजी घ्यावी असेही टोपे म्हणाले.

राजेश टोपे यांची प्रतिक्रिया

28 नमुने जिनोमिक सिक्वेसिंगसाठी -

मुंबईतील कस्तुरबा गांधी रूग्णालयात 12 तर पुण्यातील लॅबमध्ये 16 असे एकूण 28 नमुने जिनोमिक सिक्वेसिंगसाठी देण्यात आले आहेत. या नमुन्यांचे अहवाल अजून आले नाहीत. त्यामुळे या नमुन्यांचे अहवाल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्यावर भाष्य करता येणार नाही असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

ओमायक्रॉनची लागण झालेल्या रूग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी -

कर्नाटकमध्ये दोन ओमायक्रॉनचे रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून यापैकी एका रुग्णाला सुट्टी देण्यात आल्याची माहिती आपल्याला मिळाल्याचे ते म्हणाले. आतापर्यंत जगातील 30 पेक्षा अधिक देशात ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले असून ओमायक्रॉनची लागण झालेल्या रूग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी आहे. राज्यातील नागरिकांनी लसीकरण करून घेऊन नागरिकांसाठी करण्यात आलेले नियम पाळावे असे आवाहन त्यांनी केले.

रशियाहून आलेली 7 वर्षाची मुलगी कोरोना पॉझिटिव्ह -

रशियाहून अंबरनाथमध्ये आलेली 7 वर्षाची मुलगी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. यावर देखील त्यांनी भाष्य केले. जर ही मुलगी पॉझिटिव्ह आढळून आली असेल तर तिच्या संपर्कात कुणीही न राहता तिला विलगीकरणात ठेवण्यात येईल, असेही राजेश टोपे यावेळी म्हणाले.

विमान प्रवाशांच्या सर्व्हेक्षणाचे काम सुरू -

नगर येथील शासकीय रुग्णालयातील आगीच्या घटनेचा अहवाल अजूनही आलेला नाही. हा अहवाल देण्यासंदर्भात मी विनंती करीन तेथील कोणत्याही अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याचे कारण नाही असेही ते म्हणाले. ऑक्सिजन अभावी राज्यात कुणाचाही मृत्यू झालेला नाही. 1 नोव्हेंबरनंतर राज्यात आलेल्या विमान प्रवाशांची यादी घेण्यात आली असून त्यांचे सर्व्हेक्षण करण्याचे काम सुरू असून त्यांच्या संपर्कात आळलेल्याची तपासणी सुरु असल्याचे आरोग्यमंत्री टोपे म्हणाले.

हेही वाचा - Omicron Symptoms and Precautions : ओमायक्राॅन भारतात, जाणून घ्या लक्षणे आणि खबरदारीचे उपाय

Last Updated : Dec 3, 2021, 6:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.