ETV Bharat / state

कॉफी शॉपमध्ये प्रेयसीवर बलात्कार, गर्भपाताच्या गोळ्या देऊन प्रियकर फरार - तरुणीवर प्रियकराकडून दोन वेळा बलात्कार

जालन्यातील एका कॉफी शॉपमध्ये 18 वर्षीय तरुणीवर प्रियकराने बलात्कार केल्याचे उघडकीस आलंय. या कॉफी शॉपवर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी धाड टाकली होती. त्यानंतर हा खुलासा झालाय. (18 year old girl raped by boyfriend)

Jalna crime
बलात्कार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 22, 2023, 8:08 PM IST

प्रशांत महाजन, पोलीस निरीक्षक, सदर बाजार पोलीस ठाणे.

जालना : पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी जालन्यातील एका कॉफी शॉपमध्ये धाड टाकली होती. तेथून ५ महाविद्यालयीन जोडप्यांना पकडण्यात आले होते. आता या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथे एका 18 वर्षीय तरुणीवर प्रियकराकडून दोन वेळा बलात्कार झाल्याचे उघडकीस आलंय. (18 year old girl raped by boyfriend)

प्रियकर तरुणीला रुग्णालयात भरती करून फरार : या घटनेत ही तरुणी गर्भवती राहिली होती. त्यानंतर प्रियकराने तिला परस्पर गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. मात्र त्यामुळे तरुणीची तब्बेत बिघडल्याने प्रियकराने तिला एका खाजगी रुग्णालयात भरती केले. त्यानंतर तो तेथून फरार झाला. तब्बेतीत सुधारणा झाल्यानंतर पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून, प्रियकराविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपी प्रियकर सध्या फरार असून पोलिसांनी त्याच्या शोधासाठी दोन पथके रवाना केली आहेत. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

कॉफी सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू : नवीन जालना भागात कॉफी सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खळबळजनक घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. या प्रकरणी पोलिसांनी अचानक धाड टाकत कॉफी शॉप चालवण्याऱ्यासह 5 जोडप्यांना ताब्यात घेतले. हे पाचही जोडपे महाविद्यालयीन तरुण - तरुणी होते, जे कॅफेमध्ये अश्लील चाळे करताना पकडले गेले होते. तपासात, या कॉफी सेंटरचा चालक या ठिकाणी येणाऱ्या जोडप्याकडून एक तासाचे 500 रुपये घेत असल्याची माहिती उघडकीस आली आहे.

पोलिसांच्या धाडीत सर्व प्रकार उघडकीस : सदर बाजार पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून ही माहिती मिळाली होती. या कॉफी शॉपमध्ये महाविद्यालयीन मुला-मुलींला 500 रुपयांत कंपार्टमेन्ट उपलब्ध केल्या जाते आणि त्या जागेचा वापर हॉटेलच्या बेडरुमसारखा केल्या जातो, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी येथे धाड टाकली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला.

हेही वाचा :

  1. Crime News : मित्राच्या अल्पवयीन मुलीवर अनेक महिने बलात्कार, सरकारी अधिकारी निलंबित
  2. Pune Crime : अल्पवयीन तरुणासोबत महिलेचे जबरदस्तीने शरीर संबंध; गुन्हा दाखल
  3. धक्कादायक! शिक्षकाकडूनच शौचालयात 5 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.