जळगाव - मैत्रिणीचे फोटो आणि व्हिडीओ तयार करून, ते व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. विजय ऊर्फ विक्की असे या तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील एका तरुणीशी आरोपी विजय ऊर्फ विक्की संजय ठाकूर (वय २२, रा. शिवधाम अपार्टमेंट, द्वारकानगर) याने मैत्री केली. या मैत्रीचा फायदा घेऊन त्याने तरुणीचे फोटो आणि व्हिडीओ तयार केले. त्यानंतर हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याने या तरुणीवर एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत अनेकवेळा अत्याचार केला. त्याचे व्हिडीओ बनवून ते देखील व्हायरल करण्याची धमकी दिली. अखेर या तरुणीने बुधवारी आरोपी विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तरुणीने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी विक्की ठाकूरला अटक केली आहे.