जळगाव - मेहरूण येथील किराणा दुकानाचे शटर उचकावून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील रोख रकमेसह ३ मोबाईल चोरून नेल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलिसात गुन्हा -
पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, इक्रामुद्दिन शाफिद्दिन शेख हे मेहरूणमधील रजा मशीद मागील फिरदोस नगर येथे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्यांचे अक्सा नगर येथे किराणाचे दुकान आहे. हे दुकान बुधवारी २३ डिसेंबर रोजी उघडण्यासाठी गेले असता दुकानाचे शटर उघडत नसल्याने शेख यांनी दोघांच्या मदतीने ते उघडण्याचा प्रयत्न केला असता शटरचा जोरात आवाज झाला. यावेळी त्यांना शटरचे वरचे कव्हर कोणीतरी वाकवल्याचे लक्षात आले.
दुकानातील समान अस्ताव्यस्त पडलेला होता. यात २२ हजार रोख रक्कम व ६०० रुपये किमतीचे तीन मोबाईल व ३ एटीएम कार्ड व २ पॅन कार्ड व शेख व त्यांच्या पत्नीचे पॅनकार्ड असा २२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे लक्षात आले. अज्ञात विरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी करीत आहेत.
हेही वाचा - वरणगावच्या 25 कोटींच्या पाणी योजनेला स्थगिती; जलसमाधी आंदोलन करत भाजपकडून ठाकरे सरकारचा निषेध
हेही वाचा - जळगावमध्ये रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी, नियम मोडणाऱ्यांवर होणार कारवाई