ETV Bharat / state

परदेशातून जळगावात आलेल्या 306 नागरिकांचा क्वारेन्टाईन कालावधी संपला; कोरोनाचा धोका नाही

मार्च महिन्यापासून जे नागरिक परदेशातून जिल्ह्यात आले होते. त्यांचा संपूर्ण तपशील जिल्हा प्रशासनाने मिळवला होता. हे नागरिक कोरोना विषाणू संसर्गाच्या हायरिस्कमधील होते. त्यामुळे त्यांना घरीच क्वारेन्टाईन राहण्यास सांगितले होते. त्यांचा 14 दिवसांचा कालावधी संपला आहे.

Jalgaon corona
जळगाव कोरोना अपडेट
author img

By

Published : Apr 9, 2020, 10:36 AM IST

जळगाव - जिल्ह्यात परदेशातून 1 मार्चपासून 306 नागरिक आले आहेत. या नागरिकांचा 14 दिवसांचा क्वारेन्टाईन कालावधी संपला असून, त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून आलेली नाहीत, अशी माहिती नोडल अधिकारी कमलाकर रणदिवे यांनी दिली.

मार्च महिन्यापासून जे नागरिक परदेशातून जिल्ह्यात आले होते. त्यांचा संपूर्ण तपशील जिल्हा प्रशासनाने मिळवला होता. हे नागरिक कोरोना विषाणू संसर्गाच्या हायरिस्कमधील होते. त्यामुळे त्यांना घरीच क्वारेन्टाईन राहण्यास सांगितले होते. त्यांचा 14 दिवसांचा कालावधी संपला आहे. यामुळे परदेशातून आलेल्यांमुळे तुर्तासतरी भीती नसल्याने जळगाव जिल्हा प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात परदेशातून किती लोक आले, त्यांना कोरोना झाला असेल का, ते कोठे असतील, आपल्याला त्यांच्यापासून धोका आहे, अशी भीती जिल्ह्यातील नागरिकांना होती. मात्र, जिल्हा प्रशासनाने परदेशातून आलेल्यांचा शोध घेवून त्यांना क्वारेन्टाईन केले. आता कुणालाही कोरोनाची लक्षणे दिसली नाही त्यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

अशी आहे वस्तूस्थिती-

जिल्ह्यात 1 मार्चपासून ग्रामीण भागात 220 तर महापालिकाहद्दीत 86 असे परदेशातून एकूण 306 नागरिक आले होते. जे परदेशातून आले होते, अशा नागरिकांच्या संपर्कात 259 नागरिक आले होते. त्यातील ग्रामीण भागात 92 तर महापालिका हद्दीत 167 नागरिकांचा समावेश आहे. या 259 नागरिकांना जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य यंत्रणेने योग्य ठिकाणी क्वारेन्टाईन केले होते. या नागरिकांचा आता क्वारंटाईनचा कालावधीही संपला आहे. हे नागरिक आता सर्वसामान्यांसारखे व्यवहार करू शकतात. यामुळे जिल्ह्यात आता परदेशातून आलेले नागरिक, त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांपासून कोरोना संसर्गाचा धोका नाही.

निजामुद्दीन येथून आलेल्या 49 जणांचा शोध-

दिल्लीतील निजामुद्दीन येथे 13 ते 17 मार्च दरम्यान असलेले व त्यानंतर जळगाव जिल्ह्यात आलेल्या 50 नागरिकांची यादी जिल्हा प्रशासनाला मिळली आहे. या 50 नागरिकांपैकी 1 एप्रिलला 13, 3 एप्रिलला 31 आणि 5 एप्रिलला 6 नागरिकांची यादी मिळाली. त्यातील 49 जणांचा शोध जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. 49 पैकी 24 जण हे जिल्ह्यातील असून 6 जण हे राज्याच्या इतर जिल्ह्यातील आहेत. तर 19 जण हे महाराष्ट्राबाहेरील आहेत. यामध्ये रेल्वे, सैन्य दलातील आणि इतर व्यक्तींचाही समावेश आहे. त्यांचाही क्वारेन्टाईन कालावधी संपला आहे. यामुळे भीतीचे कारण नाही. राहिलेल्या एका व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. या 50 व्यक्तींपैकी कोणाचाही मरकज येथील कार्यक्रमात सहभाग नव्हता, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.