ETV Bharat / state

"कामाला लागा, हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेनं पोहोचवा", उद्धव ठाकरेंच्या माजी नगरसेवकांना सूचना

"निवडणुका केव्हाही घोषित होऊ शकतात, त्यामुळं आता गाफील न राहता लोकांमध्ये जाऊन नव्या जोमानं कामाला लागा," अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांना दिल्या आहेत.

MUNICIPAL CORPORATION ELECTION 2024
उद्धव ठाकरे (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 17 hours ago

मुंबई : विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. तर महाविकास आघाडीतील शिवसेना (उबाठा) पक्षाला अपेक्षित यश न मिळाल्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेवरील पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं कंबर कसली आहे. "मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकवायचा आहे. त्यासाठी हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरपणे मतदारांपर्यंत पोहोचवा. हिंदुत्वासाठी शिवसेना याधीही लढत होती आणि यापुढेही लढत राहील, हे मतदारांच्या मनात ठसवा, मनात रुजवा," असं आवाहन शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरेंनी केलं आहे. आज (3 डिसेंबर) शिवसेना (उबाठा) पक्षाच्या माजी नगरसेवकांची मातोश्री येथे बैठक पार पडली. यावेळी त्यांना माजी नगरसेवकांना मार्गदर्शन करताना वरील सूचना केल्या.

हिंदुत्वाचा मुद्दा रुजवा : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत पक्षाचं अस्तित्व टिकवण्याचं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर आहे. "महापालिका निवडणुकीत शिवसेनेकडून हिंदुत्वाचा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. शिवसेना हिंदुत्वासाठी यापूर्वीही लढत होती आणि यापुढेही लढत राहणार, हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण करा, मनात रुजवा. आपल्या पक्षानं हिंदुत्वाचा मुद्दा सोडला, अशा प्रकारचा अपप्रचार विरोधकांकडून केला जात आहे. त्याला योग्य रीतीनं प्रतिवाद करा," अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिल्या. ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक माजी नगरसेवक सध्या शिंदे सेनेच्या गोटात गेले असले, तरी उरलेल्या माजी नगरसेवकांसह नव्या दमाच्या नेतृत्वाला संधी देण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मातोश्री येथे बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी माजी नगरसेवकांना भावनिक साद घातली आहे.

संघटनात्मक बांधणीवर भर द्या : "भाजपाचे कार्यकर्ते बाहेरच्या राज्यातून येऊन महाराष्ट्रात पक्षासाठी काम करत आहेत. त्याचप्रमाणे आपणही तळागाळात जाऊन काम केलं पाहिजे. आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं जोरदार कामाला लागा. आपल्याला पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवायचा आहे. सदोष ईव्हीएम प्रणालीचा मुद्दा या निवडणुकीमुळं पुढं आला आहे. त्या मुद्द्याबाबत आम्ही बघू, मात्र शिवसैनिकांनी आता नव्यानं संघटनात्मक बांधणी केली पाहिजे. त्यासाठी सर्वांनी एकजुटीनं आणि ताकदीनं कामाला लागलं पाहिजे. निवडणुका केव्हाही घोषित होऊ शकतात, त्यामुळं आता गाफील न राहता लोकांमध्ये जाऊन नव्या जोमानं कामाला लागा," अशा सूचनाही उद्धव ठाकरेंनी माजी नगरसेवकांना दिल्या. या बैठकीला मुंबईतील अनेक माजी नगरसेवक, विभागप्रमुख, शाखाप्रमुख तसंच पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा

  1. मतमोजणीसाठी 'या' चार पराभूत उमेदवारांनी केले अर्ज, मतमोजणी मात्र पुढच्यावर्षी
  2. मुख्यमंत्र्यांच्या नावावर 'सस्पेन्स', तरीही महायुतीतील नेत्यांकडून आझाद मैदानाची पाहणी
  3. देवेंद्र फडणवीसांकडून 'बावनकुळे' चहावाल्याला शपथविधीचं निमंत्रण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.